तनपुरवाडी जवळ विजेचा धक्का लागून दोघे वाटसरू गंभीर जखमी.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 12:56 IST2020-12-06T12:55:41+5:302020-12-06T12:56:15+5:30
तनपुरवाडी गावाच्या जवळ तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वरील पुलावर वीजवाहक तारा तुटून विजेचा धक्का लागल्याने दोघे वाटसरू गंभीर जखमी झाले आहेत.

तनपुरवाडी जवळ विजेचा धक्का लागून दोघे वाटसरू गंभीर जखमी.
पाथर्डी- शहराजवळ असलेल्या तनपुरवाडी गावाच्या जवळ तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वरील पुलावर वीजवाहक तारा तुटून विजेचा धक्का लागल्याने दोघे वाटसरू गंभीर जखमी झाले आहेत.
अकोला येथील रहिवासी किरण रघुनाथ पंडित व निवृत्ती महादेव पंडित हे सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान पाथर्डी येथे दुचाकीवरून येत होते त्यावेळी तनपुरवाडी पुलावर उच्च दाबाच्या वीजवाहक तारा तुटून राष्ट्रीय महामार्गावर पडल्या होत्या तारा तुटून पडण्याचा अंदाज न आल्याने किरण व निवृत्ती यांची गाडी थेट विजवाहक तारांना जाऊन चिकटली दरम्यान दोघांनाही विजेचा धक्का लागल्याने दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचाराकरिता शहरातील नवजीवन एक्सीडेंट हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे राष्ट्रीय महामार्गावर उच्च दाबाच्या वीजवाहक तारा पडल्याने मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे रस्ता क्रॉस करताना विजवाहक तारांना संरक्षक तारांची जाळी नसल्याने हा अपघात घडला असून अपघात झाल्यानंतर देखील वीज वितरण कंपनीचे कर्मचारी त्या ठिकाणी फिरकले नाहीत दरम्यान स्थानिक रहिवाशांनी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना सदरील तारा पडल्या असल्या बाबत माहिती दिल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.