दोन्ही लसी परिणामकारक ; जादा डोस मात्र कोविशिल्डचे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:15 IST2021-06-22T04:15:35+5:302021-06-22T04:15:35+5:30

अहमदनगर : जिल्ह्यात गेल्या साडेचार महिन्यांपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. नगर जिल्ह्यात आतापर्यंत सव्वाआठ लाखांहून अधिक डोस ...

Both vaccines are effective; Excess dose of Covishield! | दोन्ही लसी परिणामकारक ; जादा डोस मात्र कोविशिल्डचे !

दोन्ही लसी परिणामकारक ; जादा डोस मात्र कोविशिल्डचे !

अहमदनगर : जिल्ह्यात गेल्या साडेचार महिन्यांपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. नगर जिल्ह्यात आतापर्यंत सव्वाआठ लाखांहून अधिक डोस नागरिकांना दिले गेले आहेत. परंतु यात कोव्हॅक्सिनच्या तुलनेत कोविशिल्डचे डोस अधिक आहेत. कारण कोविशिल्डची उपलब्धता जास्त आहे.

नगरसह राज्यात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला. प्रारंभी आरोग्य कर्मचारी, नंतर फ्रंटलाईन वर्कर, नंतर ६० वर्षांपुढील, ४५ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. पुढे लसीकरणाची व्याप्ती वाढवत १८ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले होते. मात्र काही कारणास्तव ते मध्यंतरी बंद झाले. आता १९ जूनपासून ३० वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे.

गेल्या साडेचार महिन्यात नगर जिल्ह्यासाठी कोविशिल्डचे सुमारे ६ लाख, तर कोव्हॅक्सिनचे सुमारे २ लाख एवढे डोस प्राप्त झाले. हे सर्व डोस लगेच लसीकरण केंद्रांना वाटप करून दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष लस दिली जाते. सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय, जिल्हा रूग्णालय व महापालिका हद्दीत अशा एकूण शंभरहून अधिक केंद्रांवर लसीकरण सुरू आहे.

----------------

१) एकूण लसीकरण -

कोविशिल्ड - ६२१०००

कोव्हॅक्सिन -२००५००

२) वयोगटानुसार लसीकरण (ग्राफ १७ जूनपर्यंत)

पहिला डोस दुसरा पहिला

आरोग्य कर्मचारी - ४४२०३ ३१९७१

फ्रंट लाईन - ५५४९० १९९६३

१८ ते ४४ - २०३०५ ६२८१

४५ ते ५९ - २४६७४२ ४१२२७

६० वर्षांवरील - २५१८४६ ७९४४९

------------------------------------------

एकूण ६१८५८६ १७८८९१

-----------------

कोविशिल्डच का?

दोन्ही लसी परिणामकारक आहेत. मात्र नगरमध्ये कोविशिल्डचे लसीकरण जास्त झाले आहे. कारण पहिल्या दिवसापासून कोविशिल्ड लसीची उपलब्धता कोव्हॅक्सिन पेक्षा अधिक आहे. पर्यायी नागरिकांना कोविशिल्ड लस अधिक मिळाली.

------------

कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन्ही लसी तेवढ्याच परिणामकारक आहेत. फक्त उपलब्धतेचे प्रमाण थोडे कमी-जास्त आहे. जी लस उपलब्ध होईल, ती नागरिकांपर्यंत पोहोच होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सव्वाआठ लाख डोस दिले गेले आहेत.

- डाॅ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी

Web Title: Both vaccines are effective; Excess dose of Covishield!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.