नगर येथे झालेल्या झुंजीत दोन्ही बिबटे ठार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 07:51 IST2021-01-19T07:50:24+5:302021-01-19T07:51:43+5:30

अकोले वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी की, रविवारी रात्री एकच्या सुमारास लहित शिवारातील एका उसाच्या क्षेत्रात एक सात ते आठ महिन्यांचा मादी व एक ते सव्वावर्षाचा नर यांच्यात झुंज सुरू होती. डरकाळ्यांचा आवाज ऐकून शेजारी राहणारे जागे झाले.

Both the leopards were killed in the clash at Nagar | नगर येथे झालेल्या झुंजीत दोन्ही बिबटे ठार!

नगर येथे झालेल्या झुंजीत दोन्ही बिबटे ठार!


राजूर (अहमदनगर) : दोन बिबट्यांच्या झुंजीत दोन्ही बिबट्यांचा मृत्यू झाल्याची घटना अकोले तालुक्यातील लहित शिवारात रविवारी रात्री एक वाजेच्या सुमारास घडली.

अकोले वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी की, रविवारी रात्री एकच्या सुमारास लहित शिवारातील एका उसाच्या क्षेत्रात एक सात ते आठ महिन्यांचा मादी व एक ते सव्वावर्षाचा नर यांच्यात झुंज सुरू होती. डरकाळ्यांचा आवाज ऐकून शेजारी राहणारे जागे झाले. मात्र, समोर जाण्यास कोणीही तयार झाले नाही. यावेळी इतरही एक बिबट्या त्या ठिकाणी असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सोमवारी सकाळी हे दोन्ही बिबट मृत झाल्याचे आढळून आले.

बिबट्यांच्या अंगावर जखमा
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी या दोन्ही बिबट्यांचे शवविच्छेदन केले. यात त्यांच्या अंगावर जखमा झाल्याचे दिसून आले. शवविच्छेदनानंतर त्यांचे काही नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे वनक्षेत्रपाल पोले यांनी सांगितले.

Web Title: Both the leopards were killed in the clash at Nagar