शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
NEET Paper Leak : पेपर विकणारेच नाही तर, लाखो रुपये खर्च करून विकत घेणारे पालकही सीबीआयच्या निशाण्यावर!
3
LPG Gas Crisis : एलपीजी सिलिंडरची परिस्थिती तशीच राहणार का? पुरवठा आणि दरांबाबत आली सर्वात मोठी अपडेट
4
​अमरावती हादरली! जुन्या वादातून तेजसची सपासप वार करत हत्या; गुन्हा दाखल होण्यापूर्वीच गुन्हे शाखेकडून ३ आरोपींना २ तासांत बेड्या
5
आजचे राशीभविष्य, १८ मे २०२६: आर्थिक लाभाचा योग, पण आर्थिक व्यवहार सावधपणे करा; काय सांगतेय तुमची राशी?
6
दरवाढीनंतर आज किती रुपयांना मिळतंय पेट्रोल-डिझेल? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
7
"लवकर निर्णय घ्या, नाहीतर काहीच शिल्लक राहणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी
8
पेट्रोल-डिझेल खिसा कापणार?- आकड्यांचं गणित पाहा!
9
कसली आलीय मंदी... कोल्हापुरात जावयाच्या चप्पलसाठी वापरली चक्क दीड किलोची चांदी
10
मान्सून उंबरठ्यावर तरी महाराष्ट्र अजून तापलेलाच! १५ शहरांत पारा ४० पार
11
'केमिस्ट्री'च्या गुणांचे भाकीत नडणार; क्लासेस, पालक, विद्यार्थीही रडारवर!
12
सीबीएसईचा विद्यार्थ्यांना दिलासा; पुनर्मूल्यांकन शुल्कात मोठी कपात
13
यूएईमध्ये अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला; युद्ध भडकण्याची चिन्हे
14
‘गुलदार’ समुद्रतळाशी स्थापित करण्यास आज प्रारंभ; अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशिल रीफ आकर्षण
15
मामाला भेटायला आलेल्या अल्पवयीन मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार
16
बीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव; एबीसी आयडी सादर न केल्याने विद्यापीठाचे पाऊल
17
संपादकीय: आपत्तीच्या दशकाची डायरी
18
बेजबाबदार परीक्षा यंत्रणांना लाज कशी वाटत नाही?
19
राज्यातील तब्बल ७० लाख शेतकऱ्यांच्या हाती सातबारा; सुटला तलाठ्याचा फेरा, ‘ई-पीक पाहणी’ मोबाइल ॲपचा वाढला वापर
20
विधान परिषदेत ठाकरेंची केवळ ३१.५८% उपस्थिती ; सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील आदिवासी शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:15 IST

शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी किमतीने धान विकावे लागू नये, यासाठी केंद्र शासनाने किमान आधारभूत योजना सुरू केली. भारतीय अन्न ...

शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी किमतीने धान विकावे लागू नये, यासाठी केंद्र शासनाने किमान आधारभूत योजना सुरू केली. भारतीय अन्न महामंडळाच्या समन्वयाने राज्य शासनाने कार्यवाही करावयाची असल्याने, आदिवासी क्षेत्रातील धान खरेदीसाठी मुख्य अभिकर्ता म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ नाशिक या विभागाची नियुक्ती करण्यात आली होती. आदिवासी विकास महामंडळामार्फत ३१ मार्चपर्यंत खरिपातील धान आणि भरडधान्य खरेदीसाठी राज्यातील आदिवासी भागात एकूण २४३ केंद्र उघडण्यात आली होती. या केंद्रांवर शेतकऱ्यांनी ३८ लाख २४ हजार ३४० क्विंटल धान आणि ७५ हजार १५ क्विंटल भरडधान्य विक्री केली होती. धान खरेदी वेळी शासनाने जाहीर केलेल्या हमीभाव प्रमाणे म्हणजेच १ हजार ८६८ रुपये प्रति क्विंटलप्रमाणे दर देण्यात आला होता, तर भरडधान्यासाठी वेगळा हमी भाव जाहीर केला होता. या हमीभाव प्रमाणे शासनाने सदर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली होती. यावेळी शासनाने ५० क्विंटलपर्यंत धान विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ७०० रुपये याप्रमाणे बोनस जाहीर केला होता. मात्र, चार महिने होत आले, तरी शासनाने बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली नव्हती.

.....................

अकोले तालुक्यातील ४८१ आदिवासी शेतकऱ्यांनी ९ हजार २०० क्विंटल धान विक्री केली होती. या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात बोनसच्या एकूण रकमेच्या ५० टक्के म्हणजे प्रति क्विंटल ७५० रुपयांपैकी ३५० रुपये रक्कम वर्ग करण्यात आली असून, उर्वरित ५० टक्के रक्कम लवकरच जमा करण्यात येणार आहे. - एन.एम. राजपूत, उपव्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय राजूर. ................