पाथर्डी तालुक्यात पकडला बोगस डॉक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 14:31 IST2018-05-15T14:31:39+5:302018-05-15T14:31:50+5:30
तालुक्यातील बोगस डॉक्टर शोध पथकाने टप्पा पिंपळगांव येथे बेकायदेशीर व विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय करणारा बोगस डॉक्टर संजय बिश्वास यास ग्रामस्थांनी पकडले

पाथर्डी तालुक्यात पकडला बोगस डॉक्टर
पाथर्डी - तालुक्यातील बोगस डॉक्टर शोध पथकाने टप्पा पिंपळगांव येथे बेकायदेशीर व विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय करणारा बोगस डॉक्टर संजय बिश्वास यास ग्रामस्थांनी पकडले असून त्याच्या ताब्यातून औषधेही हस्तगत करण्यात आले आहेत. ग्रामस्थ सतीश शिरसाठ यांच्यासह इतरांनी बोगस डॉक्टरला वैद्यकिय अधिका-यांच्या ताब्यात दिले आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. महिंद्रा बांगर, डॉ.अमोल दहिफळे यांनी ताब्यात घेतले असून फौजदारी कारवाईसाठी पाथर्डी पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन महिन्यात बोगस डॉक्टर विरुद्ध विशेष मोहीम उघडण्यात आली असून आज पर्यंत पाच बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यात आल्या आहेत.