सादतपूर शिवारातील विहिरीत आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 16:25 IST2020-07-12T16:24:59+5:302020-07-12T16:25:54+5:30

संगमनेर तालुक्यातील सादतपूर शिवारातील विहिरीत एका अनोळखी महिलेचा कुजलेला मृतदेह आढळून आला आहे.

The body of an unidentified woman was found in a well in Sadatpur Shivara | सादतपूर शिवारातील विहिरीत आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह

सादतपूर शिवारातील विहिरीत आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह

आश्वी : संगमनेर तालुक्यातील सादतपूर शिवारातील विहिरीत एका अनोळखी महिलेचा कुजलेला मृतदेह आढळून आला आहे.

    संगमनेर तालुक्यातील सादतपूर शिवारातील संपत विष्णू मगर हे त्यांच्या  मालकीच्या लोणी-तळेगाव रस्त्यालगतच्या गटनंबर ४८० मध्ये रविवारी दुपारी गेले असता त्यांना एका विहीरीजवळून जाताना दुर्गंधी आली. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना  अनोळखी  २५ ते ३० वर्षे वयाच्या महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून  आला. 

या घटनेची माहिती त्यांनी पोलीस पाटील सुनील मगर यांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन  पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. सदर महिलेची आत्महत्या की घातपात झाला? याची माहिती समजू शकली नाही.


 

Web Title: The body of an unidentified woman was found in a well in Sadatpur Shivara