मुळा नदीत आढळला पुरुषाचा मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 14:52 IST2021-03-17T14:52:01+5:302021-03-17T14:52:39+5:30
घारगाव गावच्या हद्दीतील मुळा नदीपात्रात ४० वर्षीय पुरुषाचा मृतदेह तरंगताना आढळून आला.

मुळा नदीत आढळला पुरुषाचा मृतदेह आढळला
घारगाव : घारगाव गावच्या हद्दीतील मुळा नदीपात्रात ४० वर्षीय पुरुषाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. ही घटना बुधवारी सकाळी बारा वाजलेच्या दरम्यान उघडकीस आली. शांताराम तात्याराव शिंदे (वय ४०,रा. खंदरमाळ ता.संगमनेर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
शांताराम शिंदे हे सोमवारी (दि.१५) खंदरमाळ येथील राहत्या घरून घारगाव येथे कामानिमित्त गेले होते. मात्र घरी न परतल्याने त्यांची पत्नी कल्पना (वय ३५) व मुलगा दिलीप (वय १५ ) हे शोध घेत होते. बुधवारी सकाळी नाशिक - पुणे महामार्गावर घारगाव येथील मुळा नदी पुलावरून काही नागरिकांना नदीत मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. या प्रकाराची माहिती घारगाव पोलिसांना देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. मुतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला. सदर व्यक्तीच्या मृत्यूचे कारण मात्र समजू शकले नाही.