विहिरीत आढळला आईसह मुलीचा मृतदेह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 19:48 IST2020-01-06T19:47:45+5:302020-01-06T19:48:09+5:30

कोरेगव्हाण (ता. श्रीगोंदा) येथे हंगा नदीजवळील विहिरीत आईसह सहा वर्षाच्या मुलीचा मृतदेह सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास आढळून आला.

The body of the girl, including the mother, was found in the well | विहिरीत आढळला आईसह मुलीचा मृतदेह 

विहिरीत आढळला आईसह मुलीचा मृतदेह 

विसापूर : कोरेगव्हाण (ता. श्रीगोंदा) येथे हंगा नदीजवळील विहिरीत आईसह सहा वर्षाच्या मुलीचा मृतदेह सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास आढळून आला. याबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. हा घातपात असावा असा संशय विवाहितेच्या माहेरकडील नातेवाईकांनी केला आहे.
मीना गणेश आढाव (वय ३२, रा. कोरेगव्हाण, ता. श्रीगोंदा), अनुजा गणेश आढाव (वय ६) असे मृत आई व मुलीचे नाव आहे. गणेश परशुराम आढाव हे वडील, पत्नी, मुलगीसह कोरेगव्हाण येथे राहत होते. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास पत्नी व मुलगी घरातून बाहेर पडल्याचे पती गणेश आढाव यांचे म्हणणे आहे. सोमवारी सकाळी ग्रामस्थ, विवाहितेच्या नातेवाईकांनी कोरेगव्हाण येथे शोध घेतला. गणेश आढाव याच्या घराच्या मागे हंगा नदी तिरा जवळ विहिरीजवळ विवाहितेच्या चप्पला आढळून आल्या. त्यानंतर विहिरीत शोध घेतला असता विवाहिता व मुलीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर बेलवंडीचे पोलीस निरीक्षक अरविंद माने पोलीस कर्मचाºयांसह घटनास्थळी हजर झाले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. हा घातपात असावा असा संशय विवाहितेच्या माहेरकडील नातेवाईकांनी केला आहे.

Web Title: The body of the girl, including the mother, was found in the well