माणिकदौंडीजवळ अज्ञात पुरुष व महिलेचा मृतदेह आढळला, जवळच आढळली एम.एच.-१५ पासिंगची दुचाकी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 13:07 IST2020-08-06T13:04:58+5:302020-08-06T13:07:33+5:30

माणिकदौंडी (ता. पाथर्डी) : तालुक्यातील माणिकदौडी येथील बोरसेवाडी फाटा येथे अज्ञात महिला (वय अंदाजे ३५)व पुरुषाचा (वय अंदाजे ४०) मृतदेह आढळून आला. यामुुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Bodies of unidentified men and women found near Manikdaundi, MH-15 passing two-wheeler found nearby | माणिकदौंडीजवळ अज्ञात पुरुष व महिलेचा मृतदेह आढळला, जवळच आढळली एम.एच.-१५ पासिंगची दुचाकी 

माणिकदौंडीजवळ अज्ञात पुरुष व महिलेचा मृतदेह आढळला, जवळच आढळली एम.एच.-१५ पासिंगची दुचाकी 

माणिकदौंडी (ता. पाथर्डी) : तालुक्यातील माणिकदौडी येथील बोरसेवाडी फाटा येथे अज्ञात महिला (वय अंदाजे ३५)व पुरुषाचा (वय अंदाजे ४०) मृतदेह आढळून आला. यामुुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मयत अवस्थेत गुरुवारी सकाळी मृतदेह आढळून आल्याची माहिती परिसरात वाºयासारखी पसरली. अद्यापपर्यत ओळख मृतदेहाची ओळख पटली नाही. घटनेची माहिती कळताच बिट हवालदार रांजणे व पोलीस कॉन्स्टेबल अतुल शेळके यांनी धाव घेतली.मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम चालू आहे.

मृतदेहाच्या ठिकाणी विषारी बॉटल आणि एक एच. एफ. डिलक्स एम.एच .१५ पासिंगची मोटरसायकल आढळून आली आहे.

Web Title: Bodies of unidentified men and women found near Manikdaundi, MH-15 passing two-wheeler found nearby