एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळून आल्याने उडाली खळबळ; अहमदनगरमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 11:24 IST2021-09-06T11:23:41+5:302021-09-06T11:24:06+5:30
मयतांमध्ये माता-पित्यांसह दहा वर्षाच्या मुलीचा समावेश आहे.

एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळून आल्याने उडाली खळबळ; अहमदनगरमधील घटना
अहमदनगर: केडगाव येथे एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी सकाळी केडगाव देवी रोडवरील अथर्व नगर येथे ही घटना घडली.
मयतांमध्ये माता-पित्यांसह दहा वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. संदीप दिनकर फाटक (वय 40) किरण संदीप फाटक (वय32) व मैथिली संदीप फाटक (वय 10) अशी मयतांची नावे आहेत. आई-वडिलांनी प्रथम मुलीला गळफास देऊन नंतर स्वतः आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश मानगावकर यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. फाटक हे व्यवसायिक होते. मात्र व्यवसायात नुकसान झाल्याने त्यांच्यावरील खर्च वाढले होते.याच तणावातून त्यानी कुटुंबासह आत्महत्या केली असल्याचे समोर येत आहे.