शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

अंगावर ट्रॅक्टर घालून महिलेचा खून

By admin | Updated: July 29, 2014 01:04 IST

आश्वी : शेतजमीन नांगरण्यास विरोध करणाऱ्या महिलेच्या अंगावर ट्रॅक्टर घालून तिचा खून करण्यात आल्याची घटना ओझर बुद्रूक येथे घडली.

आश्वी : शेतजमीन नांगरण्यास विरोध करणाऱ्या महिलेच्या अंगावर ट्रॅक्टर घालून तिचा खून करण्यात आल्याची घटना ओझर बुद्रूक येथे घडली. यावेळी झालेल्या हाणामारीत तीन जण गंभीर जखमी झाले. ओझर बुद्रूक येथील सखाराम भिवा नागरे व हरिभाऊ रामभाऊ कांगणे यांच्यात गट नंबर १११ मधील जमिनीवरून काही दिवसांपासून वाद सुरू होता. सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हरिभाऊ कांगणे, संदीप हरिभाऊ कांगणे, राजेंद्र हरिभाऊ कांगणे, जालिंदर सदाशिव सांगळे, दशरथ रामनाथ नागरे, मीना अर्जुन कांगणे, अरूणा दशरथ नागरे, हौसाबाई हरिभाऊ कांगणे, यमुनाबाई सदाशिव सांगळे, मथुरा घुगे, आशा कांगणे, रमेश कुटे हे सर्वजण गट नंबर १११/१ मध्ये जमीन नांगरण्यास गेले. याचवेळी सखाराम भिवा नागरे, मारूती लहानू नागरे, पार्वताबाई सखाराम नागरे, अनिता बाळासाहेब नागरे, रंजना मारूती नागरे, कौसाबाई लक्ष्मण सानप, बाळासाहेब सखाराम नागरे हे चारा काढण्यासाठी तेथे आले. उभे बाजरीचे पीक कांगणे कुटुंबीय नांगरत असल्याचे पाहून नागरे कुटुंबीयांनी त्यांना विरोध केला. दोन्ही गटात वाद सुरू होताच हरिभाऊ कांगणे यांनी हातातील कुऱ्हाडीने अनिता नागरे यांच्या डोक्यात घाव घातला, तर संदीप कांगणे याने ट्रॅक्टर(क्रमांक एम.एच.१७, के.४४६) हा पार्वताबाई नागरे यांच्या अंगावर घातला. ट्रॅक्टरच्या धडकेने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रसंगी तुफान हाणामारी होऊन अनिता नागरे, रंजना नागरे, कौसाबाई सानप या तिघी गंभीर जखमी झाल्या. अनिता नागरे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना संगमनेरच्या शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची खबर पोलीस पाटील सुभाष खेमनर यांनी आश्वी पोलिसांना दिल्यानंतर सहाय्यक फौजदार अशोक मोरे, उपनिरीक्षक अन्सार इमानदार, एकनाथ बर्वे, आर.टी. मोरे, बाळासाहेब यादव, कैलास ठोंबरे, संजय मंडलिक, रामचंद्र साळुंके यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते. (वार्ताहर)