रक्तदान मोहीम व्यापक व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:18 IST2021-01-15T04:18:52+5:302021-01-15T04:18:52+5:30
नेहरू युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा रुग्णालय, द युनिव्हर्सल फाउंडेशन, श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय, नेवासा ग्रामीण रुग्णालय, राष्ट्रीय सेवा ...

रक्तदान मोहीम व्यापक व्हावी
नेहरू युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा रुग्णालय, द युनिव्हर्सल फाउंडेशन, श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय, नेवासा ग्रामीण रुग्णालय, राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी युनिट, शिवसाम्राज्य सामाजिक प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा सप्ताहानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. रक्तदान शिबिरासह युवक-युवतींसाठी एड्स जनजागृती, निबंध चित्रकला, भित्तिपत्रक स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्राचार्य कल्हापुरे बोलत होते. यावेळी उपप्राचार्य प्रा. अरुण धनवट, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा. नवनाथ आगळे, एनसीसीचे प्रा. सुभाष आगळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहसीन बागवान, प्रा. डॉ. एम. बी. शेख, डॉ. डी. जे. सोनवणे, डॉ. मनोज पाल, डॉ. संध्या इंगोले-कवडे, सुनील हिरवे, गोकुळ गर्जे, विशाल जाधव, स्नेहल सावंत, अशोक पवार, नरेश पेवाल, मोहन पोकळे, शाहीर कान्हू सुंबे, युनिव्हर्सल फाऊंडेशनचे संचालक सागर अलचेट्टी, आदिती उंडे, शिवसाम्राज्य सामाजिक प्रतिष्ठाणचे गणेश निमसे, वैभव धनगर, अविनाश गाडेकर, श्रावण कुटे, देवेंद्र थोरात, कुशल पवार आदी उपस्थित होते.
प्रारंभी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक सागर अलचेट्टी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. नवनाथ आगळे यांनी केले. आभार मनोज पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात, जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, असोसिएशन ऑफ एनजीओ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अॅड. महेश शिंदे, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. भानुदास होले, पोपट बनकर, अॅड. अनिता दिघे यांचे मार्गदर्शन लाभले.
१४ रक्तदान
जिल्हा रुग्णालयात रक्तदान करताना एनसीसीचे छात्र.