सारोळा सोमवंशी येथे ३५ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:20 IST2021-05-01T04:20:16+5:302021-05-01T04:20:16+5:30
विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील सारोळा सोमवंशी येथे शुक्रवारी घेण्यात आलेल्या शिबिरात ३५ जणांनी रक्तदान केले. शिवाजीराव आढाव मित्रमंडळ व ...

सारोळा सोमवंशी येथे ३५ जणांचे रक्तदान
विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील सारोळा सोमवंशी येथे शुक्रवारी घेण्यात आलेल्या शिबिरात ३५ जणांनी रक्तदान केले. शिवाजीराव आढाव मित्रमंडळ व ग्रामस्थांच्या पुढाकाराने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या रक्तपेढीमार्फत रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व लोकांना मास्क व सॅनिटायझर देण्यात आले. शिवाजीराव आढाव यांनी रक्तदानाचे महत्त्व विशद केले. रक्तपेढीच्या डॉ. उगले यांनी रक्तसंकलन केले. सरपंच उज्ज्वला आढाव व उपसरपंच अंजाबापू कवाष्टे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी विठ्ठल शेळके, देवराम उदार, संदीप मापारे, देवीदास आढाव, राहुल आढाव, विष्णू नवले, पप्पू नवले, संदीप नन्नवरे, मानसिंग आढाव, सुधीर सोमवंशी, विशाल सुपेकर, नामदेव लोंढे, मोहन आढाव, बापू आढाव, शरद आगलावे व ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच उज्ज्वला आढाव यांनी गावातील पहिल्या सिव्हिल इंजिनिअर झालेल्या आकांक्षा आढाव यांचा ग्रामस्थांच्या वतीने गौरव केला.