नगरमध्ये मराठा आरक्षणासाठी रस्ता रोको
By अण्णा नवथर | Updated: September 13, 2023 13:47 IST2023-09-13T13:45:10+5:302023-09-13T13:47:25+5:30
यावेळी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

नगरमध्ये मराठा आरक्षणासाठी रस्ता रोको
अहमदनगर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने अहमदनगर शहरातील कायनेटिक चौकात बुधवारी रस्ता रोको करण्यात आला. यावेळी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मराठा समाजाला 50% तुनच आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी मराठा नेत्यांकडून यावेळी करण्यात आली. तसेच जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरू आहे. त्यांनी सरकारला एक महिन्याची मुदत दिलेली आहे . ही मुदत 13 ऑक्टोबर रोजी संपणार असून त्यानंतर नगर जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने एक बैठक आयोजित करण्यात येईल. या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांच्या वतीने जाहीर करण्यात आले.