शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची ताकद वाढणार

By admin | Updated: October 21, 2014 00:59 IST

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीत झालेल्या राजकीय फाटाफुटीचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादीला बसला आहे. पक्षाच्या विद्यमान सदस्या,

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीत झालेल्या राजकीय फाटाफुटीचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादीला बसला आहे. पक्षाच्या विद्यमान सदस्या, त्यांचे नातेवाईक आणि ज्येष्ठ नेत्यांनी भाजपा प्रवेश केला आहे. यामुळे पुढील काळात जिल्हा परिषदेच्या राजकारणात भाजपाची ताकद वाढणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेचे तीन सदस्य आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. या सदस्यांना आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागणार असून त्या ठिकाणी नव्याने पोट निवडणुका होणार आहेत.जिल्ह्यात अडीच वर्षापूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत राष्ट्रवादीने सर्वात चांगले यश मिळविले होते. जिल्हा परिषदेत ३२ सदस्यांसह राष्ट्रवादी पहिल्या स्थानावर होती. अशी अवस्था पंचायत समिती सभापती पदाच्या बाबतीतही होती. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जिल़्ह्यातील राजकीय चित्र बदलेले आहे. पुरोगामी विचारांचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या या जिल्ह्यात पाच आमदार भाजपाचे निवडून आले आहेत. कोपरगावात राष्ट्रवादीतून स्नेहलता कोल्हे विजयी झाल्या असून त्यांचे तीन समर्थक सदस्य आहे. पाथर्डीतून मोनिका राजळे विजयी झाल्या असून त्यांच्याकडे दोन समर्थक सदस्य आहेत. काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले वांबोरी गटातील सदस्य अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी निवडणुकीपूर्वी भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. नेवाशातील काँग्रेसच्या सदस्या आशा मुरकुटे यांचे पती भाजपाच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत. अकोल्यातील सदस्या सुनीता भांगरे यांचे पती अशोक भांगरे यांनी भाजपाच्या चिन्हावर निवडणूक रिंगणात होते. पारनेरात सेनेचे माजी सभापती बाबासाहेब तांबे भाजपाचे उमेदवार होते. संगमनेरात राष्ट्रवादीच्या सदस्या ललिता आहेर यांचे पती जनार्दन आहेर यांनी शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढविली. या सदस्या अथवा त्यांचे नातेवाईक जरी तांत्रिकदृष्ट्या त्या त्या पक्षात आले, तरी त्यांनी पक्ष विरोधीकृती केलेली आहे. काहींनी विरोधी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविली आहे. यामुळे त्यांच्यावर पक्षाकडून काय कारवाई होते, याकडे जिल्हा परिषदेच्या वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे कागदावर ३२ सदस्य दिसत असले तरी १० सदस्य विधानसभा निवडणुकीत वेगळ्या भूमिकेत होते. तर काँग्रेसचे ३ आणि सेनेच्या २ सदस्यांनी पक्षाच्या विरोधी काम केले. या सदस्यांवर कारवाई झाली नाही, पुढील अडीच वर्षासाठी या ठिकाणी भाजपाचे वर्चस्व राहणार असल्याचे या निमित्ताने दिसून येत आहे. (प्रतिनिधी)