भाजपाची कोपरगाव तालुका, शहर कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:34 IST2020-12-13T04:34:50+5:302020-12-13T04:34:50+5:30
नूतन कार्यकारिणीत महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी वैशाली विजय साळुंके तर शहराध्यक्षपदी वैशाली विजय आढाव यांची नियुक्ती करण्यात आली. तर युवा ...

भाजपाची कोपरगाव तालुका, शहर कार्यकारिणी जाहीर
नूतन कार्यकारिणीत महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी वैशाली विजय साळुंके तर शहराध्यक्षपदी वैशाली विजय आढाव यांची नियुक्ती करण्यात आली. तर युवा मार्चाच्या तालुकाध्यक्षपदी विक्रम पाचोरे आणि शहराध्यक्ष अविनाश पाठक यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच तालुका कार्यकारिणीत एकूण ७३ जणांच्या निवडी केल्या आहेत. यामध्ये १० उपाध्यक्ष, १२ सचिव, ४२ कोषाध्यक्ष तर शहर कार्यकारिणीत ७० जणांचा समावेश केला आहे. जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, सचिव कैलास खैरे, अनुसूचित जाती आघाडीचे विनोद राक्षे, कामगार आघाडीचे सतीश चव्हाण, बाळासाहेब पानगव्हाणे, वैभव आढाव, शिल्पा रोहमारे, योगिता होन उपस्थित होते.
121220\whatsapp image 2020-12-12 at 3.21.26 pm (1).jpeg
कोपरगाव येथे भाजपाची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे, युवानेते विवेक कोल्हे व नवनिर्वाचीत पदाधीकारी.