भाजपच्या वतीने आघाडी सरकारचा शिर्डीत निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:20 IST2021-03-22T04:20:26+5:302021-03-22T04:20:26+5:30

शिर्डी : पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या गंभीर आरोपप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. त्यांना या पदावर ...

BJP protests against the coalition government in Shirdi | भाजपच्या वतीने आघाडी सरकारचा शिर्डीत निषेध

भाजपच्या वतीने आघाडी सरकारचा शिर्डीत निषेध

शिर्डी : पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या गंभीर आरोपप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. त्यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही, अशा शब्दात आरोप करत महाविकास आघाडी सरकारचा रविवारी शिर्डीत भाजपच्या वतीने निषेध करण्यात आला.

गृहमंत्र्यावर पोलीस अधिकाऱ्यांनी पत्राद्वारे गंभीर आरोप केला आहे. या सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, असा आरोप केला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी गटनेते अशोक गोंदकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक पवार, शहराध्यक्ष सचिन शिंदे, रवि कोते, दीपक वारुळे, योगेश गोंदकर, मंगेश त्रिभुवन, राम आहेर, सुधीर शिंदे, राजेंद्र गोंदकर, प्रसाद शेलार, पप्पू मुळे, सागर जाधव, विशाल पवार, कल्पेश वारुळे, गणेश जाधव, हितेश मोटवानी आदी उपस्थित होते.

Web Title: BJP protests against the coalition government in Shirdi