शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

शिर्डीत होणार भाजपचं अधिवेशन, २२ हजार पदाधिकारी येणार; अमित शाह यांचीही उपस्थिती असणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 13:26 IST

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिर्डी येथे होत असलेल्या या अधिवेशनाला महत्त्व आले आहे.

BJP Convention Shirdi : विधानसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशानंतर भाजपाचा आत्मविश्वास दुणावला आहे. आता पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर साईनगरीत भाजपचे शनिवार व रविवारी राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. राज्यातून तब्बल २२ हजार पदाधिकारी या अधिवेशनाला येणार असून त्यांच्या निवासाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिर्डी येथे होत असलेल्या या अधिवेशनाला महत्त्व आले आहे. पक्षाच्या पुढील अध्यक्षाचीही या अधिवेशनात घोषणा होण्याची शक्यता आहे. 

रविवारी सकाळी १० वाजता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा पक्षाचा ध्वज फडकावून व प्रतिमा पूजनाने अधिवेशनाचा श्रीगणेशा करतील. सायंकाळी ५ वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. शाह यांच्या हस्ते संविधान पूजनही करण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे सर्व मंत्री, खासदार, आमदार, पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू आहे नियोजनासाठी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आठ दिवसांपासून शिर्डीत तळ ठोकून आहेत. मंडप, स्टेज, बैठक, भोजन, वाहनतळ, निवास, याचे सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला, शनिवारी (दि. ११) केंद्रीय अध्यक्ष नड्डा, मंत्री, खासदार, आमदारांशी हितगुज करणार आहेत. शहरातील व कार्यक्रम स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यांचे दुभाजक, त्यातील सिमेंट कुंड्या, विजेचे खांब याचा खुबीने वापर करून संपूर्ण मार्ग भाजपमय करण्यात आला आहे, दोन हजारावर झेंडे, २० स्वागत कमानी, फलक लक्ष वेधून घेत आहेत.

अधिवेशनाचे निमंत्रण कोणाला? 

भाजपाचे राष्ट्रीय, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस अशा पदाधिकाऱ्यांना अधिवेशनासाठी निमंत्रित करण्यात आलेले आहे. राज्यातून २२ हजार पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. मुक्कामी पदाधिकाऱ्यांसाठी भक्तनिवास व काही हॉटेल्स आरक्षित करण्यात आलेले आहेत.

टॅग्स :BJPभाजपाAmit Shahअमित शाहDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसshirdiशिर्डी