कर्जतमध्ये भाजपच्या तालुकाध्यक्षांना मारहाण; राष्ट्रवादीच्या तीन कार्यकर्त्यांविरुध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 17:35 IST2019-10-15T17:34:01+5:302019-10-15T17:35:55+5:30
कर्जत तालुका भाजपचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर यांना निवडणुकीच्या कारणावरुन मारहाण केल्याची घटना धांडेवाडी येथे सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

कर्जतमध्ये भाजपच्या तालुकाध्यक्षांना मारहाण; राष्ट्रवादीच्या तीन कार्यकर्त्यांविरुध्द गुन्हा
कर्जत : कर्जत तालुका भाजपचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर यांना निवडणुकीच्या कारणावरुन मारहाण केल्याची घटना धांडेवाडी येथे सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील धांडेवाडी येथे सोमवारी रात्री प्रचारानिमित्त तालुकाध्यक्ष खेडकर हे गेले होते. यावेळी त्यांना तू येथे प्रचाराला का आलास? ताबडतोब येथून निघून जा.. असे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी खेडकर यांना शिवीगाळ मारहाण केली. याप्रकरणी कर्जत पोलिसांनी ऋषिकेश धांडे, विलास धांडे यांच्यासह तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.