शहरं
Join us  
Trending Stories
1
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
2
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
3
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
4
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
5
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
6
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
7
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
8
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
9
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
10
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
11
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
12
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
13
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
14
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
15
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
16
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
17
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
18
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
19
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अकोलेत महाआघाडी विरुद्ध भाजपात रंगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:17 IST

अकोले : तालुक्यात ५२ ग्रामपंचायतींची निवडणूक रणधुमाळी सुरू असून, उमेदवारी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी १३ उमेदवारी अर्ज दाखल ...

अकोले : तालुक्यात ५२ ग्रामपंचायतींची निवडणूक रणधुमाळी सुरू असून, उमेदवारी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवार ते रविवार तीन दिवस सलग सुट्या असून, ३० डिसेंबर हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. ५२ गावांतील ४६६ ग्रामपंचायत सदस्य निवडले जाणार आहेत. दुपारी धुमाळवाडी येथील विक्रम घोलप यांनी पहिला उमेदवारी अर्ज दाखल करीत अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा श्रीगणेशा केला.

धुमाळवाडीसह टाकळी, वाशेरे, लहित बुद्रुक, ब्राह्मणवाडा, कोतूळ, निंब्रळ या गावांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. गेल्या ६० वर्षांत तालुक्यातील मोग्रस ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीची लढत झाली नाही. सतत बिनविरोध निवडणूक पार पडते. ही परंपरा यंदाही कायम राहण्याची दाट शक्यता आहे. तालुक्यातील म्हाळदेवी, बोरी, वाघापूर, उंचखडक खुर्द, कळस खुर्द व मोग्रस या सहा गावांत यंदा बिनविरोध निवडणूक होण्याचे संकेत मिळत आहेत.

तालुक्यात राजकीय पक्षांपेक्षा स्थनिक पुढारी व आजी माजी आमदार यांच्या गटांमध्ये गावोगावी लढती रंगण्याची चिन्हे गडद आहेत.

आमदार डॉ. किरण लहामटे यांनी निवडणूक बिनविरोध करणाऱ्या गावांसाठी २६ लाख रुपये निधी देण्याची घोषणा केली असून, किती ग्रामपंचायत बिनविरोध होतात? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. राष्ट्रवादीसह तालुक्यातील महाविकास आघाडी आणि भाजपा, अशी लढत होणार असली तरी सध्या गावोगावी बिनविरोधसाठी ग्रामस्थांच्या सभा व बैठका होऊ लागल्या आहेत. अतिउत्साही कार्यकर्त्यांच्या शेतमळ्यात ‘लेट नाइट’ बैठका झडू लागल्या आहेत.

मंगळवारी भाजपा व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तालुक्यातील काँग्रेसची स्थिती मजबूत होताना दिसत आहे. यामुळे तालुक्यातील नवलेवाडी, कुंभेफळ, देवठाण, सावरगावपाट, रुंभोडी, अशा ग्रामपंचायतींमध्ये चमत्कार घडू शकतो ?

........

कानमंत्र काय जादू करणार

बुधवारी आमदार डॉ. लहामटे, शेतकरी नेते दशरथ सावंत, ज्येष्ठ नेते अशोक भांगरे, बी.जे. देशमुख, सुरेश गडाख, भानुदास तिकांडे, विनय सावंत यांच्या शिष्टमंडळाने बारामती येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. तालुक्यातील विकासकामांसह भविष्यातील ग्रामपंचायत व सहकाराच्या निवडणुकासंदर्भाने चर्चा केल्याचे समजते.

राजूर, कोतूळ, ब्राह्मणवाडा, गणोरे, देवठाण या मोठ्या गावांत थंडीच्या मोसमात निवडणुकीचे रण चांगलेच तापले आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी शरद पवार यांच्या अकोलेतील सभेने निर्णायक दिशा दिली. बुधवारी आमदार लहामटे यांच्या शिष्टमंडळास पवार यांनी निवडणुकांच्या तोंडावर दिलेला कानमंत्र काय जादू करतो? याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.