पिसाळलेल्या कुत्र्यांनी घेतला ९ जणांना चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 17:43 IST2018-05-29T15:51:56+5:302018-05-29T17:43:21+5:30

शहरातील बेलदार गल्ली व परीसरातील लहान मुले व नागरिकांवर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला. या हल्ल्यात अनेक मुले जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 Bitten for many dogs taken by pounded dogs | पिसाळलेल्या कुत्र्यांनी घेतला ९ जणांना चावा

पिसाळलेल्या कुत्र्यांनी घेतला ९ जणांना चावा

अहमदनगर : शहरातील बेलदार गल्ली व परीसरातील लहान मुले व नागरिकांवर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला. या हल्ल्यात  ९ जणांना चावा घेतला आहे. जखमीना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सौरभ पालवे, गणेश ससाणे, अमान सय्यद, सय्यद नूर समद, शेख जावेद रशीद यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरु आहेत. तर इतर ४ जणांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 
आज दुपारच्या सुमारास अचानक पिसाळलेल्या कुत्र्याने मुलांवर हल्ला केला. यामध्ये एका मुलाच्या चेह-याला चावा घेतला आहे. तर बाकींच्याच्या पाठीला चावा घेतला आहे. यामुळे परिसरात कुत्र्यांची दहशत निर्माण झाली होती. तात्काळ महापालिका कर्मचा-यांनी घटनास्थळी दाखल होत कुत्र्यास यमसदनी पाठविले. महापौर सुरेखा कदम यांनी जिल्हा रुग्णालयात जावून जखमींची चौकशी केली.
शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत
शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. महानगरपालिकाही या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस पावले उचलताना दिसत नाही. कुत्रे पकडण्यासाठी नेमलेला ठेकेदारही शहरात कुठे दिसत नाही. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Web Title:  Bitten for many dogs taken by pounded dogs