भूमिपुत्र आले धावून कर्जतकरांच्या मदतीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:09 IST2021-05-04T04:09:45+5:302021-05-04T04:09:45+5:30
कर्जत : मुंबई, नवी मुंबई व ठाणे शहरांत राहणाऱ्या कर्जत तालुक्यातील भूमिपुत्रांनी कोरोना काळात मदतीचा हात पुढे केला आहे. ...

भूमिपुत्र आले धावून कर्जतकरांच्या मदतीला
कर्जत : मुंबई, नवी मुंबई व ठाणे शहरांत राहणाऱ्या कर्जत तालुक्यातील भूमिपुत्रांनी कोरोना काळात मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोनाच्या तपासणीसाठी दोन हजार रॅपिड ँअँटिजन किट मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्याकडे सुपुर्द केले.
मूळचे कर्जत शहरासह तालुक्यातील रहिवासी असलेले अनेक जण शासकीय अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, उद्योजक म्हणून मुंबई व परिसरात कार्यरत आहेत. काेरोनाच्या काळात तालुक्यातील लोकांसाठी काही तरी करण्याच्या उद्देशाने मित्र मंडळाने एकत्र येऊन मदत करण्याचे ठरविले.
त्या अनुषंगाने प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा केली. त्यातूनच सध्याची गरज लक्षात घेऊन जास्तीत जास्त लोकांची रॅपिड अँटिजन चाचणी करता यावी यासासाठी किट मिळावेत, अशी मागणी प्रशासनाने केली. त्यानुसार मित्रमंडळाने ५ लाख २५ हजार रुपयांच्या ५ हजार ५०० किट्स खरेदी केल्या आहेत. त्यातील २ हजार किट मिळाल्या. त्या सोमवारी तालुका वैद्यकीय अधिकारी संदीप पुंड, गटविकास अधिकारी अमोल जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, मुख्याधिकारी गोविंद जाधव आदींच्या उपस्थितीत प्रशासनाकडे सुपुर्द करण्यात आल्या आहेत. उर्वरित ३ हजार ५०० किट्स लवकरच प्रशासनाला सुपुर्द करण्यात येतील, असे भूमिपुत्र मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
---
०३ कर्जत मदत
मुंबई परिसरात राहणाऱ्या कर्जतच्या भूमिपुत्रांनी कोरोना चाचणीसाठी दोन हजार रॅपिड अँटिजन किट सोमवारी प्रशासनाकडे सुपुर्द केल्या.