भवरीलाल फुलफगर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:15 IST2021-06-24T04:15:59+5:302021-06-24T04:15:59+5:30
जवळे/ढवळगाव : पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील जुन्या पिढीतील सोने-चांदीचे प्रसिद्ध व्यापारी, श्री वर्धमान जैन श्रावक संघाचे माजी संघपती भवरीलाल ...

भवरीलाल फुलफगर यांचे निधन
जवळे/ढवळगाव : पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील जुन्या पिढीतील सोने-चांदीचे प्रसिद्ध व्यापारी, श्री वर्धमान जैन श्रावक संघाचे माजी संघपती भवरीलाल जुगराज फुलफगर (वय ८९) यांचे बुधवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात बहीण, दोन मुलगे, तीन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.
धर्मकारण, समाजकारण व राजकारणाचा गाढा अभ्यास असलेल्या भवरीलाल फुलफगर यांचे शिरूर शहर व परिसरातील धार्मिक कार्यात मोठे योगदान होते. प्रत्येक बाबीमागील शास्त्रीय कारण, विविध आजारांवरील आयुर्वेदिक उपचार याविषयी त्यांचा मोठा अभ्यास होता. शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त म्हणून शैक्षणिक कार्यातही त्यांचे मोठे योगदान होते. येथील आझाद हिंद गणेश मंडळाचे संस्थापक असलेल्या फुलफगर यांचा या मंडळाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविण्यात पुढाकार होता. येथील श्री गोडीजी पार्श्वनाथ जैन टेम्पल ट्रस्ट, सकल ओसवाल पंचायत, तिलोक पारमार्थिक संस्था यांचेही ते विश्वस्त होते. शिरूरचे माजी उपनगराध्यक्ष नेमीचंद फुलफगर व घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक धरमचंद फुलफगर यांचे ते वडील होत.
----
२३ भवरीलाल फुलफगर