भंडारद-यात भांड्याचे दुकान खाक; शॉर्टसर्किटने लागली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 10:27 IST2020-06-09T10:26:56+5:302020-06-09T10:27:38+5:30

 भंडारदरा येथील भाऊसाहेब अवसरकर यांच्या भांड्याच्या दुकानाला व जनरल स्टोअर्स दुकानाला शॉटसर्किटमुळे आग लागली. या आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे.

Bhandard-yata pot shop khak; The fire started due to short circuit | भंडारद-यात भांड्याचे दुकान खाक; शॉर्टसर्किटने लागली आग

भंडारद-यात भांड्याचे दुकान खाक; शॉर्टसर्किटने लागली आग

 भंडारदरा : येथील भाऊसाहेब अवसरकर यांच्या भांड्याच्या दुकानाला व जनरल स्टोअर्स दुकानाला शॉटसर्किटमुळे आग लागली. या आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

     भंडारदरा येथील भाऊसाहेब अवसरकर यांचे भांडे व जनरल स्टोअर्सचे दुकान आहे. या दुकानाला संध्याकाळी पाचच्या दरम्यान शॉटसर्किटमुळे आग लागली. दुकानाने पेट घेतल्यामुळे आजुबाजूचे व्यापारी, अमित दादा भांगरे मित्र मंडळाचे कार्यकर्ते, शेंडी गावचे सरपंच दिलीप भांगरे यांनी आग विझविण्यासाठी अथक मेहनत घेऊन आग विझविली.

    आग इतकी भयानक होती की आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले. आगीचा पंचनामा केला आहे

Web Title: Bhandard-yata pot shop khak; The fire started due to short circuit