सिद्धटेक : भांबोरा (ता. कर्जत) ग्रामस्थांच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून बँक ऑफ महाराष्ट्राचे बदली झालेले शाखा अधिकारी तुषार काळे व नवीन शाखा अधिकारी चक्रवर्ती तसेच सिद्धेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त पर्यवेक्षक प्रा. रोहीदास परकाळे, प्रा. सावनकुमार साळवे यांचा सन्मान केला. या सन्मानाने सत्काराने अधिकारी भारावले.
तुषार काळे म्हणाले, या सत्काराने काम करण्याची जबाबदारी दुप्पट वाढली आहे. शेतकऱ्याचा मुलगा असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. सेवानिवृत्त पर्यवेक्षक प्रा. रोहीदास परकाळे म्हणाले, गाव करील ते राव करणार नाही. सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळेचा नावलौकिक वाढविण्यासाठी कायम प्रयत्न केले. येथून पुढे ही शाळेला नेहमी सहकार्य करणार आहे.
यावेळी सरपंच माधुरी लोंढे, उपसरपंच कृष्णा शेळके, ग्रामपंचायत सदस्य वसंत लोंढे, राजेंद्र लोंढे, प्रवीण राजेभोसले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दीपक लोंढे, शैलेश लोंढे, राहुल जगताप, अनमोल लोंढे, सचिन जगताप, दत्तात्रय लोंढे, दत्तात्रय होलम, बंडू जंजीरे, सोमनाथ परकाळे, दस्तगीर शेख, प्रताप लोंढे, कल्याण जगताप, मनोज बळे आदी उपस्थित होते.