राहुरी शहरातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:24 IST2021-09-24T04:24:43+5:302021-09-24T04:24:43+5:30

राहुरी नगरपरिषद हद्दीत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. काही दिवसांपूर्वी नगरपरिषद प्रशासनाकडून अतिक्रमण ...

Begin to remove encroachments in the city of Rahuri | राहुरी शहरातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात

राहुरी शहरातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात

राहुरी नगरपरिषद हद्दीत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. काही दिवसांपूर्वी नगरपरिषद प्रशासनाकडून अतिक्रमण काढण्याबाबत नोटीस बजावण्यात आल्या. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी नगरपरिषद कर्मचारी व पोलीस बंदोबस्त घेऊन शहरातील पाण्याच्या टाकीपासून भागीरथी शाळा रोडचे अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. काही दुकानांच्या पायऱ्या तोडल्या, तर काही टपऱ्या तोडून जप्त करून घेतल्या. त्यामुळे छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांची दिवसभर धावपळ झाली. यावेळी आरपीआय आठवले गटाचे तालुकाध्यक्ष विलास साळवे व वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष पिंटू साळवे यांनी नगरपरिषदेच्या कारवाईचे स्वागत केले.

शहरातील कुलकर्णी हाॅस्पिटल ते शिवाजी चौक, शनिचौक तसेच नवीपेठ भागात धनदांडग्यांनी अनेक बांधकामे परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधली आहेत. शहरातील अनेक दवाखान्यांना पार्किंग व्यवस्था नाही. त्यांच्यामुळेच वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. पालिका प्रशासनाने अगोदर अतिक्रमणमध्ये असलेल्या धनदांडग्यांच्या मोठ्या इमारती पाडाव्यात, त्यानंतर छोट्या मोठ्या टपऱ्याधारकांवर कारवाई करावी. तसे केले तर आम्ही नगरपरिषद प्रशासन व मुख्याधिकाऱ्यांचा यथोचित सत्कार करू. धनदांडग्यांना पाठीशी घालून गोरगरिबांवर अन्याय होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. याबाबत तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी आरपीआय आठवले गट व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे.

230921\img-20210923-wa0076.jpg

?????? ???????? ?????????? ????? ???????? ????? ???? ??????? ???????? ???????? ???????

Web Title: Begin to remove encroachments in the city of Rahuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.