कोल्हे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे कोपरगावात राष्ट्रवादी-भाजपचे कार्यकर्ते भिडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 13:09 IST2018-02-17T13:08:57+5:302018-02-17T13:09:53+5:30
शुक्रवारी कोपरगावात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलन यात्रेच्या जाहीर सभेत राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आशुतोष काळे यांनी भाजप आमदार स्नेहलता कोल्हे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे शनिवारी कोपरगावात राष्ट्रवादी व भाजप कार्यकर्ते समोरासमोर भिडले.

कोल्हे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे कोपरगावात राष्ट्रवादी-भाजपचे कार्यकर्ते भिडले
अहमदनगर : शुक्रवारी कोपरगावात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलन यात्रेच्या जाहीर सभेत राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आशुतोष काळे यांनी भाजप आमदार स्नेहलता कोल्हे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे शनिवारी कोपरगावात राष्ट्रवादी व भाजप कार्यकर्ते समोरासमोर भिडले. त्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. काळे हे शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. शुक्रवारी खासदार सुप्रिया सुळे यांनी काळे हेच कोपरगावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असल्याची घोषणा केली आहे.
हल्लाबोल सभेत काळे यांनी आमदारांना गाजरबाई तर त्यांचे पती संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांचे नाव न घेता जेठालाल असा उल्लेख करीत टिका केली. त्याचे पडसाद शनिवारी सकाळपासूनच शहरात उमटले. शहरात तणाव निर्माण झाला. शहरातील अहिंसा चौकात भाजप व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते समोरासमोर एकमेकांना भिडल्याने हाणामारी झाली. भाजप कार्यकर्ते यांनी जाळण्यासाठी आणलेला आशुतोष काळे यांचा पुतळा राष्ट्रवादीने हिसकावून घेतला. हाणामारीत भाजपचा कार्यकर्ता संतोष कोळपकर जखमी झाला. शहरात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.