शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
3
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
4
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
5
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
6
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
7
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
8
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
9
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
10
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
11
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
12
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
13
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
14
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
15
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
16
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
17
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
18
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
19
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
Daily Top 2Weekly Top 5

गुंडेगाव वनक्षेत्रात निसर्गाचे सौंदर्य खुलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:15 IST

केडगाव : नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील ८५० हेक्टरवर वनक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या परिसरात निसर्ग सौंदर्य खुलले ...

केडगाव : नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील ८५० हेक्टरवर वनक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या परिसरात निसर्ग सौंदर्य खुलले असून झाड, फुलं, लहान लहान झरे यांना बहर आला आहे. परंतु, या परिसरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना येण्यास बंदी घातली आहे.

वनक्षेत्रातील प्राचीन काळातील हेमाडपंथी शुढळेश्वर मंदिर, गोसावी मंदिर, कोथूळ खंडोबा मंदिर परिसर निसर्गसौंदर्य पावसाळ्यात खुलले आहे. दरम्यान तालुक्यात फारसा पाऊस नसला तरी सुरूवातीच्या पावसामुळे येथील निसर्गाने सौंदर्याची उधळण केली आहे. जून महिन्याच्या प्रारंभी पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर पावसाने उघडीप दिली. परंतु, तरीही गुंडेगाव येथील डोंगर, निसर्ग खुलला आहे. गुंडेगावच्या परिसरात निसर्ग सहलींसाठी येणाऱ्यांना रोखण्यासाठी ग्रामसुरक्षा दल असून हौशी पर्यटकांवर कडक करवाई करण्यात येणार आहे. दरवर्षी या वनक्षेत्रात पर्यटकांची गर्दी असते. परंतु, यंदा मात्र काेरोना संकटामुळे वनविभागाने पर्यटकांना पर्यटनास मनाई केली आहे.

----

गुंडेगाव वनक्षेत्रात निसर्गाचे सौंदर्य फुलले आहे. दरवर्षी अनेक फॅमिली सहली, पर्यटक येथे येतात. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पर्यटकांनी ही नियमांचे काटेकोर पालन करावे.

-संजय भापकर,

गुंडेगाव, निसर्ग व सामाजिक प्रदूषण निवारण मंडळ प्रसिद्धी प्रमुख

180721\5953img-20210718-wa0300.jpg

गुंडेगाव फोटो