शब्दांच्या गमती जमतीतून उलगडले भाषेचे सौंदर्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:24 IST2021-03-01T04:24:02+5:302021-03-01T04:24:02+5:30
कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. यावेळी महाविद्यालाचे उपप्राचार्य डॉ. मिलिंद देशपांडे, मराठी विभागप्रमुख डॉ. प्रतीक्षा ...

शब्दांच्या गमती जमतीतून उलगडले भाषेचे सौंदर्य
कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. यावेळी महाविद्यालाचे उपप्राचार्य डॉ. मिलिंद देशपांडे, मराठी विभागप्रमुख डॉ. प्रतीक्षा गायकवाड, मराठी संशोधन केंद्राच्या प्रमुख डॉ. माहेश्वरी गावित, प्रा.डॉ. संगीता शेळके, प्रा. दया देठे, प्रा.डॉ. प्रकाश जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमात कुलकर्णी यांनी आपल्या शब्दरत्ने या कार्यक्रमात स्वातंत्र्यपूर्व काळातील वि.दा. सावरकर यांनी देशभक्तीचे स्फुलिंग पेटविलेल्या कविता, वि.वा. शिरवाडकर, गदिमा,
मंगेश पाडगावकर यांच्यासह अलीकडच्या काळातील विविध कवींच्या गाजलेल्या कविता तसेच साहित्यिकांचे गाजलेले लिखाण आपल्या अनोख्या
शैलीत सादर केले. उपप्राचार्य म्हणाले, सारडा महाविद्यालातील मराठी विभाग हा महाविद्यालयाच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे. कायम विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम व कार्यक्रमाचे आयोजन करून साहित्यिक मेजवानी विद्यार्थ्यांना देत आहेत. त्यामुळे महाविद्यालयातील पीएच.डी.धारक विद्यार्थ्यांची संख्या वाढतच आहे. प्रास्ताविकात डॉ. प्रतीक्षा गायकवाड म्हणाल्या, शहरात पुन्हा कोरोना वाढत आहे. महाविद्यालय सुरू झाले असले तरी विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी हा कार्यक्रम ऑनलाइन घेण्यात आला आहे. गाजलेल्या साहित्यिकांनी आयुष्यभर मराठीची सेवा केल्याने आजही त्यांचे साहित्य शाश्वत आहे.