Ahmednagar: बजरंगदलाच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला, २० ते २५ जणांकडून मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 13:34 IST2023-02-28T13:32:40+5:302023-02-28T13:34:15+5:30
Ahmednagar: बजरंग दलाचे शहर संयोजक कुणाल भंडारी व त्यांचा मित्र ,हे दोघे तारकपूर येथून रामवाडी कडे जात असताना वीस ते पंचवीस जणांनी त्यांच्यावर हल्ला करत मारहाण केली.

Ahmednagar: बजरंगदलाच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला, २० ते २५ जणांकडून मारहाण
- अण्णा नवथर
अहमदनगर :बजरंग दलाचे शहर संयोजक कुणाल भंडारी व त्यांचा मित्र ,हे दोघे तारकपूर येथून रामवाडी कडे जात असताना वीस ते पंचवीस जणांनी त्यांच्यावर हल्ला करत मारहाण केली. ही घटना सोमवारी रात्री साडेदहा ते साडे अकराच्या सुमारास घडली. दरम्यान पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्यासह मोठा फौज फाटा रामवाडीत दाखल झाला.
पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने प्रकरण निवळले
रामवाडी येथील दोन गटात हाणामारी सुरू होती. त्यावेळी कुणाल भंडारी व दापसे हे दोघे तेथून जात असताना गर्दी कशामुळे जमली हे पाहण्यासाठी ते दोघे थांबले होते. दरम्यान त्या जमावातील काहींनी भंडारी यांच्याकडे येत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातील एकाने खिशातील चोपर काढून कुणाल भंडारी याच्या पोटात खूपसण्याचा प्रयत्न केला. त्यास भंडारी याने प्रतिकार केला. त्यात भंडारी हे जखमी झाले असून,त्याच्यावर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान भंडारी येणे दिलेल्या जबाब आवरून कोतवाली पोलीस ठाण्यात 20 ते 25 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलांच्या भांडणातून झाला वाद
रामवाडी येथे दोन मुलांच्या भांडणावरून दोन गटात हाणामारी झाली. त्यातून हा प्रकार घडला असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.