देहरे येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By Admin | Updated: November 3, 2023 15:08 IST2014-05-09T00:42:26+5:302023-11-03T15:08:42+5:30

अहमदनगर: देहरे येथील शाळकरी अल्पवयीन मुलीवर दोन महिन्यांपूर्वी अत्याचाराची घटना गुरुवारी मुलीची मावशी व चाईल्डलाईनच्या प्रयत्नातून उघड झाली आहे़

Atrocities on a minor girl in Dehra | देहरे येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार

देहरे येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहमदनगर: देहरे येथील शाळकरी अल्पवयीन मुलीवर दोन महिन्यांपूर्वी अत्याचाराची घटना गुरुवारी मुलीची मावशी व चाईल्डलाईनच्या प्रयत्नातून उघड झाली आहे़ या घटनेने देहरे गावात खळबळ उडाली असून, घटनेचा उलगडा होताच आरोपी गावातून पसार झाला़ सविस्तर माहिती अशी, की दहरे येथील तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर गावातील ज्ञानेश्वर बंगे (वय २२) याने दोन महिन्यांपूर्वी चारचाकी गाडीत अत्याचार केल्याचे उघड झाले़ याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भादवि ३७६ बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण कायदानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अत्याचारीत मुलीने सदर घटनेची माहिती घरच्यांपासून लपूवन ठेवली होती़ सावत्र आई मारहाण करील, या भितीने मुलीने कुठेही वाच्यता केली नाही़ मात्र मुलीची प्रकृती ढासळली़ मुलीच्या वागण्यातही बदल झाला़ त्यामुळे घरच्यांना संशय आला़ त्यांनी मुलीकडे विचारपूस केली असता त्यांना मुलीने घडला प्रकार सांगितला़ परंतु घरच्या व्यक्तींनी झालेला प्रकार दाबून टाकण्याचा प्रयत्न केला़ सध्या शाळेला सुटी लागल्यानंतर मुलगी आपल्या मावशीकडे नगरला आली़ ही मुलगी कुणाशी बोलत नव्हती़ यावरून मावशीला संशय आला़ मावशीने तिच्याकडे विचारपूस केली असता हा प्रकार समोर आला़ मावशीने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चाईल्डलाईनच्या कार्यालयात धाव घेतली व घटनेची माहिती दिली़ चाईल्ड लाईनच्या कार्यालयात मुलीचे सुनील मोहिते व सोनल जगताप यांनी समपुदेशन केले़ ते मुलीला घेऊन गुरुवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गेले़ तिथे आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला़ या घटनेची दखल घेऊन पोलिसांचे एक पथक देहरे गावात चौकशीसाठी गेले होते़ मात्र आरोपी फरार असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले़ पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हाट्टेकर करत आहेत़ (प्रतिनिधी)

Web Title: Atrocities on a minor girl in Dehra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.