शिर्डी परिसरात अल्पवयीन मुलीवर पिता-पुत्राचा अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 21:30 IST2018-02-24T21:30:07+5:302018-02-24T21:30:39+5:30
शिर्डी परिसरातील एका उपनगरात सतरा वर्षाच्या मुलीवर शेजारीच राहणा-या पिता-पुत्राने शुक्रवारी मध्यरात्री अत्याचार केला. याबाबत शनिवारी शिर्डी पोलिसात फिर्याद दाखल झाली.

शिर्डी परिसरात अल्पवयीन मुलीवर पिता-पुत्राचा अत्याचार
शिर्डी : शिर्डी परिसरातील एका उपनगरात सतरा वर्षाच्या मुलीवर शेजारीच राहणा-या पिता-पुत्राने शुक्रवारी मध्यरात्री अत्याचार केला. याबाबत शनिवारी शिर्डी पोलिसात फिर्याद दाखल झाली.
या घटनेतील आरोपीने मुलीला फोन करून बाहेर बोलाविले. तिच्या वडिलांची काही तरी वस्तू देतो, असे सांगून आपल्या शेजारीच असलेल्या घरी नेले. तेथे अगोदरच असलेल्या या आरोपीच्या मुलाने व त्याने या मुलीवर अत्याचार केला़ ही घटना शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. याबाबत शनिवारी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच आरोपींना अटक करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर पाटील तपास करीत आहेत.