चोरट्यांनी फोडले एटीएम; नागरिक जागे झाल्याने फसला डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 09:45 IST2020-11-11T09:44:57+5:302020-11-11T09:45:50+5:30
बुधवारी पहाटे चोरट्यांनी नगर शहरातील पाईपलाईन रोडवरील संकल्प अपार्टमेंटच्या ग्राउंड फ्लोअरला असलेले बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम सेंटर फोडले. यावेळी परिसरातील नागरिक जागे झाल्याने चोरट्यांचा डाव फसला.

चोरट्यांनी फोडले एटीएम; नागरिक जागे झाल्याने फसला डाव
चोरट्यांनी फोडले एटीएम; नागरिक जागे झाल्याने फसला डाव
अहमदनगर: एन दिवाळीत नगर शहरात चोरट्यांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत.
बुधवारी पहाटे चोरट्यांनी नगर शहरातील पाईपलाईन रोडवरील संकल्प अपार्टमेंटच्या ग्राउंड फ्लोअरला असलेले बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम सेंटर फोडले. यावेळी परिसरातील नागरिक जागे झाल्याने चोरट्यांचा डाव फसला.
एटीएम मशीन चोरून घेऊन जाण्यासाठी चोरटे पांढऱ्या रंगाची स्कार्पिओ गाडी घेऊन आले होते. चोरट्यांनी मोठ्या प्रयत्नाने हे एटीएम फाउंडेशनमधून तोडले. एटीएम सेंटरमधून हे मशीन घेऊन जात असतानाच परिसरातील नागरिक जागे झाल्याने चोरट्यांनी तत्काळ तेथून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक सुरसे यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन या चोरट्यांचा तपास सुरु केला आहे. दरम्यान नगर शहरात गेल्या काही दिवसांपासून छोट्या-मोठ्या चोऱ्या, घरफोड्या, चैन स्नॅचिंग व रस्ता लुटीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दिवाळीनिमित्त खरेदीसाठी नगर शहरात ग्राहकांची विविध ठिकाणी मोठी गर्दी होत आहे. याचाच फायदा घेऊन चोरटे मोबाईल, चोरी पाकीटमारी, रोख रक्कम व चेन स्नॅचिंग करत आहेत. चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात पोलिसांना पुरते अपयश आले आहे. पोलिसांनी नगर शहरात रात्रीसह दिवसाची गस्त वाढून या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.