शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगावात रेमडेसिवीर इंजेक्शनचा कृत्रिम तुटवडा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : कोरोनाची जास्त लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर करावा लागतो; परंतु हे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : कोरोनाची जास्त लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर करावा लागतो; परंतु हे इंजेक्शन विक्री करणाऱ्या कोपरगावातील मेडिकलमध्ये कृत्रिम टंचाई निर्माण करून चढ्या भावाने विक्री होत असल्याचा नातेवाइकांचा आरोप आहे. त्यामुळे या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने लक्ष घालून यावर नियंत्रण आणण्याची मागणी होत आहे.

कोपरगावात गेल्या महिनाभरापासून कोरोना रुग्णांची मोठी वाढ होत आहे. त्यामुळे शासनाचे कोविड केअर सेंटर, हेल्थ सेंटर, तसेच खासगी दवाखान्यातील बेड बाधित रुग्णांनी खचाखच भरलेले आहेत. या सर्वच ठिकाणी उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर करून उपचार केला जात आहे. त्यामुळे या इंजेक्शची कोपरगावात मोठ्या प्रमाणात मागणी वाढली असून, शहरातील ठराविक मेडिकलमधूनच विक्री होत आहे.

एखाद्या बाधित रुग्णाचा नातेवाईक हे इंजेक्शन मिळत असलेल्या मेडिकलमध्ये खरेदी करण्यासाठी गेला, तर त्यास सुरुवातीला इंजेक्शन उपलब्धच नाही. मात्र, थोड्या वेळाने उपलब्ध होऊ शकते. त्यासाठी जास्तीचे पैसे द्यावे लागतील, असे उघडपणे मेडिकलचालकाकडून सांगण्यात येते. त्यावर अनेक मेडिकल पालथे घालूनही इंजेक्शन मिळत नाही, म्हटल्यावर नातेवाइकांना नाइलाजास्तव शासनाच्या नियमाप्रमाणे ९०० ते १,२०० रुपये किमतीच्या इंजेक्शनसाठी ५ हजार रुपये मोजावे लागत आहेत. यातून मोठी लूट केली जात आहे.

.........

मेडिकलची तक्रार...

॰ कोपरगाव शहरातील एका मेडिकलमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनची साठवणूक करून चढ्या भावाने विक्री होत असल्याची कोणीतरी शिर्डी येथील पोलीस उपअधीक्षक कार्यालयात तक्रार केली होती. त्यावर सदर मेडिकलचालकास बुधवारी (दि.७) रात्री चौकशीसाठी शिर्डीला नेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

॰ त्यावर उपअधीक्षक कार्यालयाच्या सूचनेनुसार गुरुवारी (दि.८) सकाळी नोडल अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौदर व शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक वासुदेव देसले यांनी मेडिकलची तपसणी केली असता मेडिकलमध्ये फक्त चारच इंजेक्शन सापडले असल्याचे डॉ. फुलसौदर यांनी सांगितले.

.........

शिर्डी येथे माझ्या नातेवाइकावर कोरोनाचा उपचार सुरू असून, त्यांना रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज भासली. त्यासाठी मी स्वतः कोपरगावातील इंजेक्शन विक्रीस असलेल्या मेडिकलमध्ये चौकशी केली, तर इंजेक्शन नसल्याचे सांगण्यात आले, तर एका मेडिकलमध्ये पाच हजार रुपये देऊन इंजेक्शन मिळू शकते, अशी माहिती मिळाली. परिस्थिती नसल्याने ते घेणे शक्य नव्हते. त्यावर एका मित्राने प्रयत्न करून १,३०० रुपयांमध्ये इंजेक्शन उपलब्ध करून दिले. त्यामुळे अशा चढ्या भावाने विक्री करणाऱ्यावर शासनाने नियंत्रण आणावे.

-आदिनाथ ढाकणे, अध्यक्ष, गोदामाई प्रतिष्ठान, कोपरगाव

..............

शासनाचे नियम मोडून मेडिकलमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनची साठवणूक करून, तसेच चढ्या भावाने विक्री करताना आढळल्यास मेडिकलवर कारवाई करण्यात येईल, तसेच यापुढे यंत्रणेमार्फत सर्वच मेडिकलवर बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे.

-प्रशांत सरोदे, सहायक घटना व्यवस्थापक, कोपरगाव