शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे झाले पाणी...‘या’ तालुक्यात प्रकार उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 13:33 IST

कोरोना संसर्गाच्या धर्तीवर ग्रामपंचायतींना नागरिकांना वाटप करण्यासाठी पुरवठा करण्यात आलेल्या रोग प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या ‘आर्सेनिक अल्बम’ गोळ्या निकृष्ट दर्जाच्या आढळून आल्याने शेवगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. विशेष बाब म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले यांच्या तालुक्यात हा प्रकार उघड झाला आहे.

अनिल साठे

लोकमत विशेष

शेवगाव : कोरोना संसर्गाच्या धर्तीवर ग्रामपंचायतींना नागरिकांना वाटप करण्यासाठी पुरवठा करण्यात आलेल्या रोग प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या ‘आर्सेनिक अल्बम’ गोळ्या निकृष्ट दर्जाच्या आढळून आल्याने शेवगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. विशेष बाब म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले यांच्या तालुक्यात हा प्रकार उघड झाला आहे.

ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगाच्या रकमेवरील व्याज जिल्हा परिषदेने जमा करुन घेऊन त्याच्या मोबदल्यात रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लागणाऱ्या आर्सेनिक अल्बम-३० गोळ्यांचा पुरवठा करण्यात आला. सदर गोळ्या अहमदनगर जिल्हा परिषद करिता सुमन होमिओ फार्मसी (पुणे) यांनी पुरवठा केल्या आहेत. मात्र त्या डब्यात गोळ्याऐवजी पाणी, तसेच घट्ट झालेला पांढरा द्रव पदार्थ तयार झाला आहे. यामुळे गोळ्यांच्या दर्जा बाबत शंका उपस्थित झाल्या आहेत.

तालुक्यातील वाघोली ग्रामपंचायतीने गावातील नागरिकांसाठी वाटप करण्यासाठी आणलेल्या १४ पाकिटातील डब्या उघडल्या असता हा गंभीर प्रकार समोर आला आहे.

विशेष बाब म्हणजे जिल्हा परिषदेच्या खात्यावर तब्बल पाच महिन्यांपूर्वी १ लाख ४८ हजार ७६० रुपये इतकी रक्कम सदर गोळ्यासाठी जमा केली होती. पंचायत समितीमधून गोळ्या घेऊन जाण्यासाठी फोन आला असता ३१ डिसेंबर रोजी ग्रामपंचायतचे शिपाई बबन बोरुडे हे गोळ्यांचे पाकीट घेऊन आले होते.

नागरिकांचा गोळ्या घेण्यास नकार

शनिवारी सकाळी नागरिकांना सदर गोळ्या वाटप करण्यासाठी घेतल्या असता बहुतांश डब्यात पातळ द्रव व घट्ट झालेला द्रव दिसून आला. भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष उमेश भलसिंग यांनी ही बाब समोर आणली. यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांना या गोळ्या घेण्यास नकार दिला.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याmedicineऔषधंHealthआरोग्य