कूूळ कायदा विभागातील लिपीकास लाच मागितल्याप्रकरणी अटक; खंडकरी शेतक-याला मागितले ५० हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 13:10 IST2020-03-09T12:03:54+5:302020-03-09T13:10:54+5:30
खंडकरी शेतक-याचे येथील कूळ कायदा विभागात आलेले प्रकरण मार्गी लावून देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागणा-या लिपिकास नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (९ मार्च) सकाळी साडेअकरा वाजता अटक केली. सुनील बाबूराव फापाळे (वय ४८) असे अटक केलेल्या लिपिकाचे नाव आहे.

कूूळ कायदा विभागातील लिपीकास लाच मागितल्याप्रकरणी अटक; खंडकरी शेतक-याला मागितले ५० हजार
अहमदनगर : खंडकरी शेतक-याचे येथील कूळ कायदा विभागात आलेले प्रकरण मार्गी लावून देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागणा-या लिपिकास नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (९ मार्च) सकाळी साडेअकरा वाजता अटक केली. सुनील बाबूराव फापाळे (वय ४८) असे अटक केलेल्या लिपिकाचे नाव आहे.
फापाळे हा जिल्हाधिकारी कार्यालयातील कूळ कायदा शाखेत अव्वल कारकून म्हणून कार्यरत आहे. श्रीरामपूर येथील खंडकरी शेतकºयाचे प्रकरण कायदेशीर मान्यतेसाठी कूळ कायदा शाखेत वर्ग झाले होते. या प्रकरणाची पुढील प्रक्रिया करण्यासाठी फापाळे यांनी सदर शेतकºयाकडे लाच मागितली होती. याबाबत शेतक-याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
दरम्यान, सोमवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचा-यांनी सापळा लावून लाच मागणा-या लिपिकास पकडले. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
....