कळस येथील विहीरीत आढळल्या तब्बल १० दुचाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 16:17 IST2018-12-22T16:17:07+5:302018-12-22T16:17:11+5:30
अकोले तालुक्यातील कळस येथील पुला जवळील दोन विहिरीत दहा दुचाकी मिळाल्या. या सर्व दुचाकी चोरीच्या आहेत.

कळस येथील विहीरीत आढळल्या तब्बल १० दुचाकी
राजूर : अकोले तालुक्यातील कळस येथील पुला जवळील दोन विहिरीत दहा दुचाकी मिळाल्या. या सर्व दुचाकी चोरीच्या आहेत.
पुलाच्या शेजारीच असणा-या विहिरीत दोन दुचाकी असल्याचे येथील एका शेतक-याने अकोले पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी शोध घेतला. या विहिरीत दोन दुचाकी मिळाल्यानंतर पोलिसांनी शेजारील विहिरीतही चौकशी केली असता या विहिरीत दुचाकी असल्याचा संशय आला. विहिरीत गळ टाकल्यानंतर या विहिरीतही मोटार सायकली असल्याचे दिसून आले. स्थानिकांची मदत घेत पोलिसांनी या विहिरीतून आठ दुचाकी काढल्या. एकूण १० दुचाकी पोलिसांच्या हाती लागल्या. अजून काही दुचाकी असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त करत शोध घेत आहेत.