साकुरी परिसरात व्यापा-यावर सशस्त्र हल्ला; ४३ हजाराला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 16:43 IST2020-06-14T16:42:17+5:302020-06-14T16:43:04+5:30

राहाता तालुक्यातील साकुरी येथील व्यापा-यावर दरोडेखोरांनी कोयत्याने वार केला. त्यानंतर त्याच्याकडील ४३ हजार रुपये लुटून नेल्याची घटना १२ जून रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.

Armed attack on traders in Sakuri area; 43 thousand were looted | साकुरी परिसरात व्यापा-यावर सशस्त्र हल्ला; ४३ हजाराला लुटले

साकुरी परिसरात व्यापा-यावर सशस्त्र हल्ला; ४३ हजाराला लुटले

राहाता :  तालुक्यातील साकुरी येथील व्यापा-यावर दरोडेखोरांनी कोयत्याने वार केला. त्यानंतर त्याच्याकडील ४३ हजार रुपये लुटून नेल्याची घटना १२ जून रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.  

   परसराम नारायण सुध्दाला (वय ४९,रा.साकुरी) यांनी राहाता पोलिसात याबाबत फिर्याद दिली आहे. १२ जून रोजी रात्री आठवाजण्याच्या सुमारास साकुरी येथील गोदावरी वसाहतीतून जात असताना आरोपी राहूल शिंदे व नसिर बाबू शेख यांनी मला अडविले. यानंतर माझ्या डोक्यात, हातावर कोयत्याने वार केले. यानंतर पॅटच्या खिशातून ४३ हजार रुपये हिसकावून पलायन केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. 

 सुध्दाला यांच्या फिर्यादीवरुन राहाता पोलिसांनी या आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे करीत आहेत. 

Web Title: Armed attack on traders in Sakuri area; 43 thousand were looted