स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुख पदी दिनेश आहेर यांची नियुक्ती

By अण्णा नवथर | Updated: April 4, 2023 12:04 IST2023-04-04T12:04:10+5:302023-04-04T12:04:17+5:30

स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख अनिल कटके यांची मागील महिन्यात जळगाव येथे बदली करण्यात आली होती.

Appointment of Dinesh Aher as Head of Local Crime Branch | स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुख पदी दिनेश आहेर यांची नियुक्ती

स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुख पदी दिनेश आहेर यांची नियुक्ती

अहमदनगर: येथील सायबर पोलीस ठाण्याचे प्रमुख पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांची स्थानिक गुन्हे  शाखेच्या प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सोमवारी रात्री उशिराने काढला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख अनिल कटके यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी आहेर यांची युक्ती करण्यात आली आहे. दिनेश आहेर हे नुकतेच बीड येथून बदलून आले आहेत. त्यांची नेमणूक सायबर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. तेथून त्यांची नियुक्ती आता स्थानिक गुन्हे शाखेत करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख अनिल कटके यांची मागील महिन्यात जळगाव येथे बदली करण्यात आली होती. परंतु त्यांचा परिक्षेत्रातील कार्यकाळ पुढील दोन महिन्यांनी संपुष्टात येणार असल्याने त्यांना नगर येथेच मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत वाढ कायम ठेवून त्यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे.

Web Title: Appointment of Dinesh Aher as Head of Local Crime Branch