इंदोरीकर महाराज खटल्यात अंनिसचा हस्तक्षेप अर्ज मान्य; लेखी युक्तिवादाला न्यायालयाची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2020 06:28 IST2020-09-19T01:42:49+5:302020-09-19T06:28:02+5:30

अंनिसच्यावतीने या प्रकरणात दाखल करण्यात आलेला हस्तक्षेप अर्ज संगमनेर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी शुक्रवारी सुनावणीवेळी मान्य करत लेखी युक्तिवादाला परवानगी दिली.

Annis' intervention in Indorikar Maharaj case accepted; Court permission for written argument | इंदोरीकर महाराज खटल्यात अंनिसचा हस्तक्षेप अर्ज मान्य; लेखी युक्तिवादाला न्यायालयाची परवानगी

इंदोरीकर महाराज खटल्यात अंनिसचा हस्तक्षेप अर्ज मान्य; लेखी युक्तिवादाला न्यायालयाची परवानगी

संगमनेर (जि. अहमदनगर) : निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी बाळाच्या जन्मासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानाच्या आरोपावरून त्यांच्याविरोधात संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयात फिर्याद दाखल आहे. अंनिसच्यावतीने या प्रकरणात दाखल करण्यात आलेला हस्तक्षेप अर्ज संगमनेर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी शुक्रवारी सुनावणीवेळी मान्य करत लेखी युक्तिवादाला परवानगी दिली.
इंदोरीकर यांनी वादग्रस्त विधान केल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरोधात संगमनेरच्या ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर भवर यांनी १९ जून रोजी संगमनेर न्यायालयात फिर्याद दिली होती.
३ जुलै रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. डी. कोळेकर यांच्यासमोर कामकाज झाले होते. त्यानंतर इंदोरीकरांचे वकील के. डी. धुमाळ यांनी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या या प्रकरणातील स्थगितीच्या आदेशाची माहिती संगमनेर न्यायालयात दिली. त्यानंतर पुढील सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयात घेण्यात आली.
या प्रकरणात अंनिसच्यावतीने अ‍ॅड. रंजना गवांदे यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल केला होता. त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली.
अंनिसचा अर्ज न्यायालयाने मान्य केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात अ‍ॅड. गवांदे यांना लेखी युक्तीवाद करता येणार आहे. पुढील सुनावणी २८ आॅक्टोबर रोजी होणार आहे.

Web Title: Annis' intervention in Indorikar Maharaj case accepted; Court permission for written argument