शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
3
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
4
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
5
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
6
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
7
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
8
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
9
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
10
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
11
Marathi News LIVE: मुंबईकरांवर पाणीसंकट, १५ मेपासून १० टक्के पाणी कपातीचा निर्णय, जलाशयात घट
12
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
13
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
14
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
15
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
16
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
17
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
18
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
19
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
20
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
Daily Top 2Weekly Top 5

पशुखाद्याचे दर गगनाला;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चांंदेकसारे : पूर्वी शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी दूध व्यवसाय निवडला. कालांतराने हा मुख्य व्यवसाय झाला. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चांंदेकसारे : पूर्वी शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी दूध व्यवसाय निवडला. कालांतराने हा मुख्य व्यवसाय झाला. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून दुधाचे दर कमी झाल्याने ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. एकीकडे पशुखाद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, तर दुसऱ्या बाजूला दुधाचे दर ढासळले आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

पोहेगाव सोनेवाडी, जेऊर कुंभारी, डाऊच खुर्द आदी परिसरात शेतकऱ्यांनी दूध व्यवसायाला जास्त पसंती दिली. शेतकऱ्यांची अनेक मुले नोकरीच्या मागे न लागता दूध व्यवसायात उतरून आर्थिक उन्नती साधण्याचा प्रयत्न करतात. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून दूध व्यवसायाला उतरती कळा लागली असून दुधाचे दर सोळा ते वीस रुपयांवर आल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. पशुधन वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना घरातून पैसे टाकावे लागत आहेत. सरकी पेंड व इतर खाद्याचे दर गगनाला भिडले असून जे खाद्य ९०० ते १ हजार रुपयाला मिळायचे, त्या खाद्याची किंमत २ हजार रुपये झाल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना उत्पन्न व खर्चाचा मेळ साधताना मोठी कसरत करावी लागत आहे.

अनेक नेत्यांनी सरकारकडे दुधाला अनुदान देण्याची मागणी केली आहे. मात्र ती मागणी हवेत विरली आहे. कोरोना परिस्थितीचे कारण सांगून मोठ्या दूध उत्पादक संघांनी शेतकऱ्यांच्या दुधाला कवडीमोल भाव देत शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे. सहा महिन्यांपूर्वी दोन गाई पाळल्या तरी शेतकऱ्यांना २५ ते ३० हजार रुपये महिन्याला मिळत होते. एक गाय साधारण वीस लिटर दूध देते. खाद्यखर्च वजा जाता त्यावेळी दूध उत्पादकांना हा व्यवसाय नफ्याचा वाटायचा. मात्र आता खाद्य आणि चारा याची गोळाबेरीज केली तरी, शेतकऱ्यांच्या हातात काहीच शिल्लक राहत नाही. मध्यंतरी दूध विक्रीदर २ रुपये वाढवले. मात्र दूध खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना एक रुपयाही वाढवला नाही. ही परिस्थिती अशीच राहिली, येत्या काही दिवसात ही परिस्थिती सुधारली नाही, तर ग्रामीण भागातील दूध व्यवसाय मोडकळीस येण्याची चिन्हे आहेत.