अहमदनगरमध्ये ३० गुंठे जागा बळकावण्याचा प्रयत्न

By अण्णा नवथर | Updated: July 8, 2023 16:03 IST2023-07-08T16:01:28+5:302023-07-08T16:03:41+5:30

आमदार संग्राम जगताप यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन जागेवर ताबा घेणाऱ्यांवर कडक कारवाई  करावी, अशी मागणी केली होती.

An attempt to grab 30 guntas of land in the ahmednagar | अहमदनगरमध्ये ३० गुंठे जागा बळकावण्याचा प्रयत्न

अहमदनगरमध्ये ३० गुंठे जागा बळकावण्याचा प्रयत्न

अहमदनगर: येथील मौजे माळीवाडा येथील भवानीनगर परिसरात जालना येथील शेतकऱ्याने विकत घेतलेल्या ३० गुठे जागेभोवतीची संरक्षण भिंती जेसीबीच्या सहाय्याने तोडून जागा बळकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत जागा मालक अमन अमित पटवारी( रा.माणिकनगर, जि. छत्रपती संभाजीनगर ) यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली असून, राजकीय अर्शिवादाने हा प्रकार सुरू असयलाचे पटवारी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

नगर शहरात मोक्याच्या जागांवर ताबा घेण्याचे प्रकार घडत आहेत. मध्यंतरी आमदार संग्राम जगताप यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन जागेवर ताबा घेणाऱ्यांवर कडक कारवाई  करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतरही हे प्रकार थांबलेले नाही. जालना येथील शेतकरी पटवारी यांनी नगरमध्ये खरेदी केलेल्या जागेभोवतीचे संरक्षण भिंती उखडून फेकून ताबा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती पटवारी यांनी दिली आहे. पोलीस संरक्षणात पुन्हा संरक्षणभिंत बांधार असल्याचेही त्यांनी सांगितले

Web Title: An attempt to grab 30 guntas of land in the ahmednagar