शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
3
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
4
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
5
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
6
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
7
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
8
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
9
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
10
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
11
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
12
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
13
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
14
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
15
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
16
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
17
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
18
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
19
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
20
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

युती तुटल्याने नगर भाजपात जल्लोष!

By admin | Updated: September 27, 2014 00:14 IST

अहमदनगर : शिवसेना-भाजपा युती तुटल्याने नगर शहरातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला आहे.

अहमदनगर : शिवसेना-भाजपा युती तुटल्याने नगर शहरातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला आहे. युती तुटू नये, या प्रामाणिक भावनेपेक्षा नगरमधील शिवसेनेच्या जाचातून मुक्तता झाल्याचा आनंद भाजपा पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. आता कोणालाही तिकिटे देऊन कोणाचेही पाय धुण्याची वेळ येणार नाही, यासाठी भाजपाच्या निष्ठावंतांनी देव पाण्यात ठेवले आहेत.शिवसेना-भाजपाची युती तुटल्याची घोषणा गुरुवारी सायंकाळी झाली. त्यानंतर नगरमध्ये भाजपा आणि शिवसेनेच्या गोटात वेगवान हालचाली झाल्या. आमदार अनिल राठोड, खासदार दिलीप गांधी, वसंत लोढा, सत्यजित तांबे, किशोर डागवाले, संग्राम जगताप यांच्या कार्यालयात तातडीच्या बैठका झाल्या. त्यामध्ये विधानसभेमध्ये प्रचाराची रणनिती ठरविण्यात आली. शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये नेहमीच धुसफूस राहिलेली आहे. लोकसभेत युती असुनही शिवसेनेने भाजपाचा कधीच प्रचार केला नव्हता. भाजपाने मात्र राठोड यांचा प्रामाणिकपणे प्रचार केल्याचा दावा केला आहे. (प्रतिनिधी)आता पंचरंगी लढतशिवसेनेची आमदार अनिल राठोड यांना, काँग्रेसची सत्यजित तांबे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची संग्राम जगताप यांना उमेदवारी निश्चित आहे. त्यांनी अपक्ष आणि राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र भाजपाचा उमेदवार कोण आहे, याची निश्चिती नव्हती. भाजपाची उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकांनी मुंबईवारी केली. त्यासाठी खासदार गांधी, आमदार कर्डिले यांनीही काहींसाठी शिष्टाई केल्याची माहिती आहे. अखेर शुक्रवारी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर यांना भाजपाची उमेदवारी जाहीर झाली. मनसेने वसंत लोढा यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेमुळे लोढा यांची उमेदवारी गोठणार का? याकडे लक्ष लागले आहे. सध्यातरी नगर शहरामध्ये पंचरंगी लढत होणार असून मतविभाजनाचा नक्की कोणाला फायदा होणार? हे पाहणे गमतीशीर असणार आहे.