महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या पुतळ्याला दारूचा अभिषेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 14:36 IST2021-05-28T14:35:10+5:302021-05-28T14:36:49+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त करून महाविकास आघाडी सरकारच्या पुतळ्याला दारूचा अभिषेक घालण्यात आला. दारु दुकाने सर्रास सुरु असून, इतर सर्व व्यवहार बंद ठेवल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या पुतळ्याला दारूचा अभिषेक
अहमदनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त करून महाविकास आघाडी सरकारच्या पुतळ्याला दारूचा अभिषेक घालण्यात आला. यावेळी मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे, उपशहर अध्यक्ष गणेश शिंदे, संकेत व्यवहारे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. दारु दुकाने सर्रास सुरु असून, इतर सर्व व्यवहार बंद ठेवल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.
कोरोना महामारीच्या काळामध्ये सरकारने लॉकडाऊन जाहीर करत सर्व व्यापार ठप्प करण्यात आले. सरकारने फक्त दारू विक्री चालू ठेवण्याचे आदेश दिले. कपड्याच्या दुकान, किराना, मोबाईलच्या दुकान, ऑटोमोबाईल या सर्व क्षेत्रांमध्ये काम करणारे कामगार आज दोन ते तीन महिने झाले त्यांना पगार नाही. त्यांना कोणतीही शासनाची मदत नाही. किराणामाल चोरून विकायचे व दारू खुलेआम विक्री होत आहे. सर्वसामान्य दुकानदाराची आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे. सरकारने दारूविक्री पार्सल सुविधा चालू करण्याचे आदेश दिलेले आहे. शहरांमध्ये १० हाजार रिक्षावाले आहे, त्यांना फक्त ५०० रिक्षावाल्यांना सरकारने मदत केलेली आहे व बँक फायनान्स कंपनी यांच्या हप्ते भरायला सुद्धा सर्वसामान्य नागरिक व्यापारी कामगार यांच्याकडे पैसे राहिलेले नाही आणि कुठल्या प्रकारचे बँकवाले थांबत नाही. सरकारने सर्वसामान्यांचा विचार करून योग्य नियोजन करून बाजारपेठ लवकरात लवकर चालू करण्याचे आदेश देण्यात यावेत. सरकारचा मनसेच्या वतीने जाहिर निषेध करण्यात आला व येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन मनसेच्या वतीने रास्तारोको आंदोलन केला जाईल, असा इशारा मनसेचे नितीन भुतारे यांनी दिला.