अकोले पोलीस ठाण्यात गोंधळ घातला म्हणून गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:22 IST2021-04-23T04:22:47+5:302021-04-23T04:22:47+5:30
शिवाजी धुमाळ, बाबासाहेब नाईकवाडी, सुमन जाधव, अनिकेत जाधव व इतर ७ ते ८ जणांविरुद्ध भादंवि कलम १६० नुसार गुन्हा ...

अकोले पोलीस ठाण्यात गोंधळ घातला म्हणून गुन्हा दाखल
शिवाजी धुमाळ, बाबासाहेब नाईकवाडी, सुमन जाधव, अनिकेत जाधव व इतर ७ ते ८ जणांविरुद्ध भादंवि कलम १६० नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल किशोर तळपे करत आहेत.
पोलीस ठाण्यात येऊन राजकीय पुढारी पोलिसांच्या समोर अरेरावी, दमदाटी, शिवीगाळ, हाणामारी करत सार्वजनिक शांततेचा भंग करतात, याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर बुधवारी सायंकाळी सव्वा पाच वाजता वरील चौघांसह ११ ते १२ जणांविरुद्ध पोलीस नाईक बारकू बाळू गोंधे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
सोशल मीडियाच्या पोस्टवरून एक प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. भाजपच्या एका पदाधिकाऱ्यावर कारवाई झाली. या प्रकरणाच्या अनुषंगाने १८ एप्रिल २०२१ रविवारी रात्री सव्वानऊ वाजता राजकीय पुढारी कार्यकर्ते पोलीस ठाण्यात आले होते. त्यांच्यात पोलिसांसमोर पोलीस ठाण्याच्या आवारात शिवीगाळ, मारामारी झाली होती. त्यानंतर चार दिवसांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घालणाऱ्या संबंधितांवर गुन्हा दाखल झाला आहे.