शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नगरच्या नेत्यांच्या आधी अजित पवार, अण्णा हजारे गोळीबारात जखमी झालेल्या शेतक-यांच्या भेटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 12:31 IST

दुपारपर्यंत जिल्ह्यातील स्थानिक नेते गोळीबारात जखमी झालेल्या शेतक-यांकडे फिरकले नाहीत. पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी यांच्यासह भाजपचा कोणताही नेता शेतकऱ्यांच्या भेटीला गेला नाही. 

अहमदनगर : शेवगाव येथे पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेल्या शेतक-यांकडे नगर जिल्ह्यातील एकही नेता फिरकला नसताना अजित पवार यांनी गुरूवारी सकाळीच नगर येथे जखमी शेतक-यांची रूग्णालयात भेट घेत विचारपूस केली. अण्णा हजारे यांनीही जखमी शेतक-यांची भेट घेतली. दुपारपर्यंत जिल्ह्यातील स्थानिक नेते या जखमींकडे फिरकले नाहीत. पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी यांच्यासह भाजपचा कोणताही नेता शेतकऱ्यांच्या भेटीला गेला नाही. नगर हा सहकारी साखर कारखानदारांचा जिल्हा आहे. जिल्ह्यात एकूण २३ सहकारी व खासगी कारखाने आहेत. ऊस दराबाबत सर्व साखर कारखानदार एकमेकांची काळजी घेत असतात. त्यामुळेच ऊस उत्पादकांच्या आंदोलनापासून सर्व नेते सोयीस्करपणे दूर असतात. बुधवारी शेवगाव तालुक्यातील गंगामाई साखर कारखान्यावर शेतक-यांचे आंदोलन सुरू असताना हिंसक वळण लागून पोलिसांना शेतक-यांवर लाठीमार करावा लागला. यावेळी झालेल्या गोळीबारात दोन शेतकरी जखमी झाले आहेत.या आंदोलनाबाबत राधाकृष्ण विखे यांनी बुधवारी सरकारच्या निषेधाची प्रतिक्रिया माध्यमांना पाठवून दिली. मात्र, त्यांच्यासह त्यांच्या परिवारातील, तसेच काँग्रेस पक्षातील कोणीही आंदोलकांकडे फिरकले नाही. गुरूवारी दुपारी विखे जखमींना भेट देणार असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे स्थानिक नेतेही या घटनेबाबत मौन बाळगून आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी अद्यापपर्यंत याप्रकरणी आपल्या प्रतिक्रियाही दिलेल्या नाहीत. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या तालुक्यात हा प्रकार घडूनही ते शेतक-यांच्या भेटीला गेले नाहीत. या सर्व पार्श्वभूमीवर अजित पवार हे काहीही कल्पना न देता गुरूवारी सकाळी साडेसात वाजताच नगरला रूग्णालयात पोहोचून जखमी शेतक-यांना भेटले. तसेच त्यांनी शेवगाव तालुक्यातील घोटण, खानापूर येथे भेट देऊन शेतक-यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत नगरचे आमदार संग्राम जगताप होते. या घटनेबाबत हिवाळी अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचे पवार यावेळी म्हणाले. या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDilip Gandhiखा. दिलीप गांधीAjit Pawarअजित पवारanna hazareअण्णा हजारेRam Shindeराम शिंदे