अहमदनगर : केडगावमधील अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2018 14:54 IST2018-01-20T14:54:47+5:302018-01-20T14:54:53+5:30
पुणे मार्गावर असणाऱ्या केडगावमध्ये तवेरा आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

अहमदनगर : केडगावमधील अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू
अहमदनगर - पुणे मार्गावर असणाऱ्या केडगावमध्ये तवेरा आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात केडगाव पोलीस चौकी समोरच झाला . तवेरा ( एम एच १४ A V -६७४२ ) आणि दुचाकी ( क्र एम एच १६ बी पी ९४९७ ) यांच्यात जोराची धडक झाली यात दुचाकीवरील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील मृत नगरमधील रहिवासी असून अद्याप त्यांची ओळख पटलेली नाही . कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
यातील एक मृत व्यक्ती श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील, तर एक जण सावेडी उपनगर येथील रहिवासी असल्याचे माहिती समोर आली आहे. परंतु, त्यांची नावं अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकलेली नाहीत. अपघाताची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार एल. बी.हंडाळ यांच्यासह कर्मचा-यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.