शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान संतापला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
3
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
4
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
5
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
6
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
7
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
8
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
9
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
10
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
11
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
12
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
13
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना
14
महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
15
साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 
16
आधीच्या ओबीसी आरक्षणानुसार ४ महिन्यांत निवडणुका घ्या; मिनी विधानसभेचा मार्ग मोकळा
17
पदवीसाठी २७ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी ; उद्यापासून प्रवेश
18
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
19
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
20
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन

अहमदनगरमध्ये दररोज २० टक्के पाण्याची गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 08:52 IST

महापालिका सध्या मुळा धरणातून दररोज ७५० लाख लिटर पाणी उचलत असून नगरकरांना प्रति माणशी १०० लिटर पाणी मिळते.

अण्णा नवथर

अहमदनगर : महापालिका सध्या मुळा धरणातून दररोज ७५० लाख लिटर पाणी उचलत असून नगरकरांना प्रति माणशी १०० लिटर पाणी मिळते. तब्बल २० टक्केपाण्याची गळती होत असल्याने मध्यवर्ती शहरात दिवसाआड, तर उपनगरांत ३ ते ४ दिवसांनी पाणी दिले जात आहे.अहमदनगर शहराची लोकसंख्या साधारण ४ लाखांच्या घरात आहे. महापालिका जलसंपदा विभागाकडून दररोज ७५ एलडी पाणी घेते. प्रति माणशी १३० लिटर पाणी मिळणे अपेक्षित असताना १०० लिटर मिळते. दोन्ही जलवाहिन्या जुन्या झाल्याने त्यांना वारंवार गळती लागते. त्यामुळे पाणीपुरवठा खंडित होतो. धरण खाली आणि शहर वर, अशी स्थिती असल्याने अन्य शहरांच्या तुलनेत अहमदनगर महापालिकेची पाणी योजना खर्चिक आहे. महापालिकेचे मुळानगर, विळद, नागापूर, वसंत टेकडी ही चार पाणी उपसा केंदे्र आहेत. या ठिकाणी बसविण्यात आलेल्या विद्युत पंपांचे वीज बिल दरमहा २ कोटी रुपये येते. दुरुस्तीसाठी येणारा खर्च ४ लाखांच्या घरात आहे. पाणी योजनेचा खर्च मोठा असला तरी त्या तुलनेत पाणीपट्टी वसूल होत नाही. दरवर्षी होणारा तोटा जवळपास १५ कोटींच्या घरात आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी महापालिकेने पाणीपट्टी दुप्पट करण्याचा ठराव २०१७ मध्ये दिला होता; परंतु त्यास मंजुरी दिली नाही. सध्या महापालिका दीड हजार रुपये पाणीपट्टी आकारते. असे असले तरी पाणीपट्टीचे २० कोटी थकीत आहेत.

107 कोटीची अमृत पाणी योजना

२०१० मध्ये ११६ कोटींची शहर सुधारित पाणी योजना, तर २०१७ मध्ये १०७ कोटींची अमृत पाणी योजना मंजूर आहेत; पण त्या अर्धवट असल्याने कमी पुरवठा होतो. शहर सुधारित पाणीपुरवठा योजनेतून नगर शहरातील १९ जलकुंभांचे काम पूर्ण झाले आहे; परंतु जलवाहिनीचे काम अपूर्ण असल्याने हे कुंभ पूर्ण क्षमतेने भरत नाहीत.

टॅग्स :environmentपर्यावरणWaterपाणीAhmednagarअहमदनगर