अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीची धुरा बाबासाहेब वाकळेंवर खांद्यावर

By अण्णा नवथर | Updated: June 8, 2023 18:49 IST2023-06-08T18:48:46+5:302023-06-08T18:49:54+5:30

अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुक प्रमुखांची यादी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केली .

Ahmednagar South Lok Sabha election on Babasaheb Vakle's shoulders |  अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीची धुरा बाबासाहेब वाकळेंवर खांद्यावर

 अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीची धुरा बाबासाहेब वाकळेंवर खांद्यावर

अहमदनगर : अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुक प्रमुखांची यादी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केली असून, अहमदनगर दक्षिण लोकसभेच्या निवडणुकीची धुरा माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. भाजपने लाेकसभा व विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी विधानसभा व लोकसभा निवडणूक प्रमुखांची नावे गुरुवारी जाहीर केली आहेत. 

शिर्डी लोकसभा निवडणुक प्रुमुखपदी राजेंद्र गोंदकर यांची नियुक्ती करण्यात आली आहेत. अगामी विधानसभा निवडणूकप्रमुख पदी माजी आमदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये अकोले- माजी आमदार वैभव पिचड, संगमनेर- सतीष कानवडे, शिर्डी- ॲड. रघुनाथ बोठे, कोपरगाव- माजी आमदार स्नेहलता कोल्हे, श्रीरामपूर- नितीन दिनकर, नेवासा- माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, शेवगाव- नारायण पालवे, राहुरी- माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, पारनेर- विश्वनाथ कोरडे, अहमदनगर- शहरजिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, श्रीगोंदा- बाळासाहेब महाडिक, कर्जत- जामखेड- आमदार राम शिंदे यांचा समावेश आहे.

Web Title: Ahmednagar South Lok Sabha election on Babasaheb Vakle's shoulders