अहमदनगर : एशियनच्या नावाखाली बनावट पेंटची विक्री, नगरमधून एकास अटक 

By अण्णा नवथर | Updated: July 1, 2023 16:36 IST2023-07-01T16:35:52+5:302023-07-01T16:36:06+5:30

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली.

Ahmednagar Selling fake paint in the name of Asian one arrested from the city | अहमदनगर : एशियनच्या नावाखाली बनावट पेंटची विक्री, नगरमधून एकास अटक 

अहमदनगर : एशियनच्या नावाखाली बनावट पेंटची विक्री, नगरमधून एकास अटक 

अहमदनगर: एशियन कंपनीच्या नावाखाली बनावट पेंटची विक्री करणाऱ्या एकास अहमदनगर येथून अटक करण्यात आली आहे. हितेश कांतीलाल पटेल ( ३३, रा. समर्थनगर, बुरुडगाव ) असे अटक केलेल्या दुकानदाराचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी ( दि. ३० ) सायंकाळी ही कारवाई केली.

एशियन कंपनीच्या नावाखाली बनावट पेंटची अहमदनगर शहरात विक्री सुरू आहे, अशी महिती कंपनीच्या दिल्ली येथील कार्यालयास प्राप्त झाली होती. त्यानुसार दिल्ली येथील कंपनीचे मुख्य तपासी अधिकारी आनंद राधेश्याम प्रसाद हे शुक्रवारी अहमदनगर येथे आले होते. त्यांनी पाेलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन याबाबत माहिती दिली.

त्यानुसार कंपनीचे प्रतिनिधी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चितळे रोडवरील पेंटस कॉर्नर दुकानावर छापा टाकला. त्यावेळी तिथे एशियन कंपनीचे स्टीकर्स व बनावट पेंट आढळून आला. आरोपीला ताब्यात घेऊन २ लाख ७४ हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली.

Web Title: Ahmednagar Selling fake paint in the name of Asian one arrested from the city